Aryan Khan Update: आर्यन खान ‘त्या’ अटींचे पालन करतोय का?; महत्त्वाची माहिती आली समोर


हायलाइट्स:

  • ड्रग्ज प्रकरणात जामीन देताना घातलेल्या अटींचे पालन होतेय का?
  • अरबाजचे वडील अस्लम मर्चंट यांनी दिली महत्त्वाची माहिती.
  • आव्हान असलं तरी आर्यन व अरबाज अटींचे पालन करणार.

मुंबई: क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला जवळपास एक महिना कोठडीत काढावा लागला. त्याला मुंबई हायकोर्टाने जामीन दिला असला तरी जामीन देताना कठोर अटी घातल्या आहेत. या अटींचे पालन करणे बंधनकारक असून आर्यन या अटी पाळत आहे की नाही, याबाबत महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. ( Aryan Khan Bail Latest News )

वाचा: आर्यनच्या सुटकेसाठी २५ कोटींचे डील?; सॅम डिसूझाने केला मोठा गोप्यस्फोट

ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा या तिघांना एकाचवेळी जामीन मंजूर झाला. हा जामीन मंजूर करताना कोर्टाने अनेक अटी घातल्या. त्यात जामिनावर असताना तिघांनीही एकमेकांच्या संपर्कात राहायचं नाही, अशी अट कोर्टाने घातली आहे. त्यामुळे बालपणीपासूनचे मित्र असलेल्या आर्यन व अरबाज यांच्यासाठी ही मोठी परीक्षाच ठरली आहे. याबाबत अरबाजचे वडील अस्लम मर्चंट यांनी महत्त्वाची माहिती दिली.

वाचा: ठाकरे सरकारला मोठा धक्का; अनिल देशमुख यांच्या अटकेआधी नेमकं काय घडलं?

अस्लम मर्चंट म्हणाले,’ कोर्टाने जी अट घातली आहे, त्यानुसार जामिनावर सुटल्यानंतर आता आर्यन व अरबाज या दोघांनाही एकमेकांशी कोणत्याही प्रकारे संपर्क करता येणार नाही. हे दोघांसाठीही खरंतर आव्हान आहे पण अरबाज माझ्याशी याबाबत बोलला आहे. अटींचे पालन मला करावेच लागेल, असे तो म्हणालाय. त्या नरकात कोण जाईल, त्यापेक्षा सक्तीने कोर्टाचे नियम पाळलेले बरे, असेही त्याने सांगितल्याचे अस्लम मर्चंट म्हणाले. अरबाज हा आर्यनचा जवळचा मित्र आहे आणि आर्यन अडचणीत येईल असं कोणतंही काम तो करणार नाही. म्हणूनच दोघांनीही एकमेकांपासून दूर राहण्याचे ठरवले आहे, असे मर्चंट यांनी सांगितले.

वाचा:शाहरुखच्या वाढदिवसाला ‘मन्नत’ चा जलवा, रोषणाईचा Video पाहाच

दरम्यान, क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आर्यन खान याला ३ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. त्याच्यासोबत अरबाज व मूनमूनलाही अटक करण्यात आली होती. तिघांनाही प्रथम एनसीबी कोठडी देण्यात आली होती तर नंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आर्यनला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले होते. जामिनासाठी या तिघांनाही मोठी धडपड करावी लागली. एनडीपीएस कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तिघांनीही हायकोर्टात धाव घेतली. तिथे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आर्यनची बाजू मांडली. अटकेनंतर अखेर २६व्या दिवशी आर्यनसह तिघांनाही जामीन मिळाला. हा जामीन देताना कोर्टाने अनेक अटी घातल्या आहेत. जो आरोप आहे तशी कोणतीही कृती घडता नये, कोर्टाच्या कार्यवाहीबाबत कोणतेही विधान करू नये, पासपोर्ट जमा करावा, विशेष एनडीपीएस कोर्टाच्या पूर्वपरवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ नये, अशा त्यातील काही अटी आहेत.

वाचा:मुंबई क्रुझ प्रकरणः काँग्रेसने भाजपवर केला धक्कादायक आरोप



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: