rahul gandhi support virat kohli : ट्रोल होत असलेल्या विराटला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘… आपल्या टीमला वाचव’


नवी दिल्लीः टी-२० वर्ल्डकपमध्ये कर्णधार विराट कोहलीच्या संघाला एकामागून एक पराभवाचा ( rahul gandhi support virat kohli ) सामना करावा लागतोय. यामुळे क्रिकेट चाहते प्रचंड नाराज आहेत. पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीलाही वाईट प्रकारे ट्रोल करण्यात आलं होतं. त्यावेळी विराटने शमीचा बचाव केला होता. मुलीवर बलात्कार करण्याची धमकीही विराट कोहलीला देण्यात आली होती.

विराट कोहलीला ट्रोल करण्यात येत आहे. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विराट कोहलीच्या समर्थनात ट्विट केले आहे. ‘प्रिय, विराट… या लोकांमध्ये द्वेष भरलेला आहे. कारण त्यांना कुणीही प्रेम देत नाही. त्यांना माफ कर आणि आपल्या टीमला वाचव’, असं राहुल गांधी ट्विटमध्ये म्हणाले.

पाकिस्तानने टीम इंडियाचा १० गडी राखून मोठा पराभव केला. पाकिस्तानने पहिल्यांदाच टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा पराभव केला. त्यानंतर न्यूझीलंडविरोधातही भारताचा पराभव झाला.

bypoll results 2021 : ‘जनतेचा मूड बदलतोय…..’, पोटनिवडणुकीत भाजपच्या पराभवावर बोलली काँग्रेस

भारत आणि अफगाणिस्तानमध्ये आज सामना

टी-२० वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानविरुद्धचा सामना भारतासाठी करो या मरो, असा असेल. कारण हा सामना गमावल्यावर भारताचे विश्वचषकातील आव्हान संपणार आहे. भारतीय संघाने अफगाणिस्तानबरोबरचा सामना जिंकला तरच त्यांना उपांत्य फेरीत पोहोचता येणार आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: