दुकानात सुरू होता जुगार; पोलिसांनी छापा टाकत केली मोठी कारवाई


हायलाइट्स:

  • कोल्ड्रिंक्सच्या दुकानात सुरू होता जुगार
  • पोलिसांनी टाकला छापा
  • मुद्देमाल जप्त करत आरोपींविरोधात दाखल केला गुन्हा

तुळजापूर : शहरातील बोंबले चौक येथे तिरट नावाचा जुगार खेळला जात असताना पोलिसांनी छापा टाकला आहे. यावेळी एकूण १ लाख ४६ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसंच या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर शहरातील बोंबले चौक हडको येथील राज कोल्ड्रिंक्स या दुकानात पत्र्याच्या शेडमध्ये काही लोक पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत आहेत, अशी माहिती खबऱ्यांमार्फत पोलिसांना मिळाली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे-पाटील यांच्या आदेशावरून उपविभागीय पोलीस पथकाने राज कोल्ड्रिंक्स या दुकानात अचानक जाऊन छापा मारला.

शाळेत जात असताना पळवून नेत १६ वर्षीय मुलीवर अत्याचार!

यावेळी नऊ जण रिंगण करून पत्त्यांवर पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळताना आढळून आले. सदर इसमांना पोलिसांनी पकडले आणि त्यांची पंच समक्ष झडती घेण्यात आली. यावेळी त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम आणि इतर साहित्य पोलिसांकडून जप्त करण्यात आली.

दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रोडगे यांच्या फिर्यादीवरून नऊ आरोपींविरुद्ध कलम ४,५ महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस पथकाचे पोलीस नाईक योगेश मांडोळे, पोलीस अंमलदार गणेश आतकरे, बालाजी जाधव, ऋषिकेश गवळी, अमर माळी आणि एकनाथ नागरगोजे या पथकाने केली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: