munde on deshmukh’s arrest: अनिल देशमुखांना अटक; धनंजय मुंडे म्हणतात, ‘अटकेचे कारण ‘हे”


हायलाइट्स:

  • अनिल देशमुखांच्या अटकेनंतर धनंजय मुंडे यांची भाजपवर टीका.
  • सरकार अस्थिर करण्यासाठीच देशमुख यांना अटक- मुंडे.
  • अजित पवार कोणत्याही चौकशीला समोरे जाण्यास तयार- मुंडे.

बीडः राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. देशमुख यांना झालेली अटक बेकायदेशीर असल्याचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटल्यानंतर आता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सरकार अस्थिर करण्यासाठीच अशा प्रकारच्या चौकशा लावल्या जात असल्याचे सांगत मुंडे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. (minister dhananjay munde criticizes bjp over arrest to former home minister anil deshmukh)

धनंजय मुंडे हे परळीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर झालेले सर्व आरोप खोटे असून सरकार अस्थिर करण्यासाठी चौकशा लावल्या जात आहेत, असे सांगतानाच यामध्ये भाजपकडून राजकारण केलं जात असल्याची टीका मुंडे यांनी केली आहे. मात्र असं असलं तरी महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे, भाजपने कितीही प्रयत्न केला तरी काही फायदा होणार नाही, असे मुंडे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- अजित पवारांशी संबधित संपत्तीवर जप्ती?; वकिलाकडून ‘हा’ मोठा खुलासा

यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील आरोपांवर देखील भाष्य केले. अजित पवार हे कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही अनिल देशमुख यांच्या अटकेबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनिल देशमुख हे चौकशी यंत्रणेला सहकार्य करत होते. असे असतानाही त्यांना अटक केली जाते. हे मुळात दुर्दैवी आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी बेपत्ता असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याबाबतही मत व्यक्त केले आहे. परमबीर सिंग सध्या बेपत्ता आहे. कोर्टाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे, असे सांगतानाच ते जर परदेशात गेले असतील तर त्यांना कोणाची साथ आहे, असा सवाल पवार यांनी विचारला आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री करण्यासाठी सर्व प्रयत्न करणार’; काँग्रेस नेत्याचे मोठे विधान
क्लिक करा आणि वाचा- फडणवीसांवरील टीकेने भाजप आमदार संतापले; नवाब मलिक यांच्यावर केली बोचरी टीकाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: