amarinder singh resigns congress : सोनिया गांधींना पत्र लिहित अमरिंदर सिंग यांनी दिला काँग्रेसचा राजीनामा, पक्षाचे नाव घोषित


चंदिगडः पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अखेर मंगळवारी पक्षाचा राजीनामा दिला. गेल्या महिनाभरापासून बंडाचे निशाण फडकवलेल्या अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा देत काँग्रेस सोडली. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी यापूर्वीच नवा पक्ष स्थापन करून विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.

मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यापासून कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बंडखोरीचा सूर आळवला होता. पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नवज्योत सिंग सिद्धू यांची निवड झाल्याने ते नाराज झाले होते. यानंतर सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर यांच्यात शाब्दीक फैरी झडल्या होत्या. त्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आता त्यांनी काँग्रेसचाही राजीनामा दिला आहे.

अमरिंदर यांनी पक्षाचे नाव केले जाहीर

पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या नव्या पक्षाची घोषणा केली. आगामी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत आपल्या नव्यासह निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले होते. अमरिंदर सिंग यांनी आपल्या पक्षाच्या नावाची घोषणा केली आहे. ‘पंजाब लोक काँग्रेस’, असे पक्षाचे नाव असेल, असं त्यांनी सांगितलं. पंजाब लोक काँग्रेस राज्यातील सर्व जागांवर आपले उमेदवार उभे करू शकते. कॅप्टन अमरिंदर यांनी यापूर्वीच तसे संकेत दिले होते.

सिद्धूंवर साधला निशाणा

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावरही निशाणा साधला आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्याचा फटका पक्षाला सोसावा लागेल, असे ते म्हणाले. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या धरसोड वृत्तीमुळे राज्यातील निवडणुकीच्या तयारीत काँग्रेसला झटका बसू शकतो, असे कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले.

सोनियांना लिहिलेल्या पत्रात काय म्हणाले अमरिंदर सिंग?

आपल्या ५२ वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत तुम्ही मला किंवा माझे चारित्र्य नीट समजून घेतले नाही. मी इतकी वर्षे काँग्रेसची सेवा करत आहे आणि तुम्ही मला एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला. मी थकलो नाही आणि निवृत्तही झालेलो नाही. पंजाबला देण्यासाठी माझ्याकडे अजून खूप काही आहे. मी एका सैनिकासारखे पुढे जाईल आणि मागे मागे हटणार नाही, असं ते म्हणाले.

bypoll results 2021 : ‘जनतेचा मूड बदलतोय…..’, पोटनिवडणुकीत भाजपच्या पराभवावर बोलली काँग्रेस

राहुल आणि प्रियांकावर हल्लाबोल

अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रातून राहुल गांधी आणि प्रियांका गांधींवर निशाणा हल्लाबोल केला. तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या वर्तनाने मी खूप दुखी झालो आहे. मी अजूनही माझ्या मुलांइतकेच त्यांच्यावर प्रेम करतो, असं ते म्हणाले. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या आठवणींना उजाळा त्यांनी दिला. १९५४ मध्ये आम्ही शाळेत एकत्र शिकायचो. ६७ वर्षांपूर्वीच्या त्यांच्या वडिलांसोबतच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. पण माझ्याइतका अपमान आजपर्यंत अन्य कोणत्याही ज्येष्ठ काँग्रेस नेत्याचा झाला नसेल, अशी व्यथा अमरिंदर सिंग यांनी मांडली.

by election results : पोटनिवडणुकीचा रणसंग्राम; कुठल्या राज्यात कोणी किती जागा जिंकल्या? वाचा…

राज्य आणि देशाची सुरक्षा प्रथम

राज्य आणि देशाची सुरक्षा आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. तुम्ही राज्य ज्यांच्या हाती दिले आहे, त्या अननुभवी नेत्यांची आपल्याला खूप काळजी वाटते. हे अननुभवी नेते संवेदनशील राज्याची सुरक्षेची स्थिती कशी हाताळतील हे समजत नाही. इथं स्फोटकं आणि अंमली पदार्थांची मोठी आवक होते. त्यामुळे आता या परिस्थितीतून बाहेर पडण्याची गरज आहे, असे आवाहन अमरिंदर सिंग यांनी केले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: