लग्न करण्यासाठी ‘ते’ दोघे घरातून पळाले; त्याआधीच दोघांच्या प्रेम कहाणीचा झाला दुर्दैवी अंत


इटाह : तरूण – तरूणी दोघेही प्रेमात आकंठ बुडाले होते. दोघांनीही लग्न करून सुखी संसाराची स्वप्ने बघितली होती. दोघेही लग्न करण्यासाठी घरातून पळून गेले. लग्न करून सुखी संसाराला सुरुवात करण्याआधीच त्यांचे स्वप्न भंग पावले. उत्तर प्रदेशातील इटाह जिल्ह्यातील एका प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत झाला.

उत्तर प्रदेशातील इटाह जिल्ह्यात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. प्रेम विवाह करण्यासाठी घरातून पळालेल्या प्रेमी युगुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत या दोघांचाही मृत्यू झाला. तर या अपघातात तरुणाच्या चुलत भावाचाही मृत्यू झाला. या घटनेची माहिती मृतांच्या पालकांना मिळताच, त्यांना मोठा धक्का बसला.

मुंबईत NCB ची पुन्हा मोठी कारवाई; या भागातून जप्त केले कोट्यवधींचे हेरॉइन

इटाह जिल्ह्यातील देहात परिसरात रेल्वे उड्डाणपुलाजवळ रविवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस ठाण्याचे प्रभारी जगदीश चंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरूण, त्याचा चुलत भाऊ आणि तरूणी दुचाकीवरून जात होते. रेल्वे उड्डाणपुलाजवळ त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या तिघांचाही मृत्यू झाला. हे तिघेही कोतवाली नगर परिसरातील एका गावातील रहिवासी होते.

पान खाऊन ‘तो’ किचनच्या खिडकीबाहेर थुंकला; त्यानंतर घडली भयंकर घटना!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात इतका भीषण होता की, तरूण आणि तरुणीचा मृत्यू जागीच झाला. तर तरुणाच्या चुलत भावाला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबात चुलत भावाने सांगितले की, तरूण आणि तरुणीचे प्रेमसंबंध होते. दोघेही लग्न करण्यासाठी घरातून पळून जात होते. तो स्वतः या दोघांना दुचाकीवरून कासगंजला सोडण्यासाठी जात होता. त्याचवेळी अपघात झाला. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: