हायलाइट्स:
- देगलूर बिलोली पोटनिवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर काँग्रेस नेते भास्करराव पाटील खतगावकर यांचे मोठे विधान.
- देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात मोठे यश- भास्करराव पाटील खतगावकर.
- अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री करण्यासाठी सर्व प्रयत्न करणार- खतगावकर.
देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर यांच्या विजयानंतर खतगावकर यांनी अशोक चव्हाण यांची प्रशंसा केली आहे.अशोक चव्हाण यांच्या कुशल नेतृत्वांमुळे हा विजय मिळाल्याचे ते म्हणाले. या विजयामुळे अशोक चव्हाण यांना आम्हाला पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पाहायचे आहे. जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवला असून आता अशोक चव्हाण यांना पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे खतगावकर यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- चिंताजनक! करोनाच्या दैनंदिन मृत्यूसंख्येत वाढ; हजारावर नव्या रुग्णांचे निदान
या विजयानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही. भाजपने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला होता. भाजपच्या या प्रयत्नांना देगलूर बिलोलीच्या मतदारांनी साथ दिली नाही. आम्ही मात्र विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवली, असे सांगतानाच हा जनतेचा विषय असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. यावेळी चव्हाण यांनी शंकरराव चव्हाण यांच्या स्मृती जागवल्या.शंकरराव चव्हाण यांच्या पुण्याईला जनतेची नेहमीच मोठी साथ मिळाली आहे. राज्यात काँग्रेसला पूर्वीपेक्षा अधिक मतदान यावेळी झाले आहे, असे सांगत हा महाविकास आघाडीचा विजय असल्याचे ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- फडणवीसांवरील टीकेने भाजप आमदार संतापले; नवाब मलिक यांच्यावर केली बोचरी टीका
क्लिक करा आणि वाचा- महाविकास आघाडीला मोठा धक्का; अनिल देशमुखांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी