हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांत राज्यात १ हजार ०७८ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये एकूण १ हजार ०९५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- आज राज्यात एकूण ४८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज राज्यात झालेल्या ४८ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ५३ हजार ५८१ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५९ टक्के इतके आहे.
क्लिक करा आणि वाचा- फडणवीसांवरील टीकेने भाजप आमदार संतापले; नवाब मलिक यांच्यावर केली बोचरी टीका
मुंबईत राज्यातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण
आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजार ४८५ इतकी आहे. काल ही संख्या १५ हजार ५५२ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता मुंबई जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबईत हा आकडा ४ हजार २५० इतकी आहे. तर पुणे जिल्ह्यात हा आकडा ३ हजार २०४ इतकी आहे. ठाणे जिल्ह्यात ही संख्या १ हजार ७०६, तर अहमदनगरमध्ये ही संख्या २ हजार ००२ इतकी आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ४१४ अशी आहे. तसेच, सांगलीत एकूण ४०१ इतकी आहे. तर, सोलापुरात ही संख्या ३२० इतकी आहे. तर, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ५६९, रत्नागिरीत १४७ इतकी कमी झाली आहे, तर सिंधुदुर्गात ती २४८ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा- महाविकास आघाडीला मोठा धक्का; अनिल देशमुखांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी
धुळे जिल्ह्यात एक सक्रिय रुग्ण
या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४८९, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ६७ इतकी आहे. अमरावतीत ही संख्या १७ वर आली आहे. तर धुळे जिल्ह्यात राज्यात सर्वात कमी, म्हणजेच एक सक्रिय रुग्ण आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘तुम्ही कधी तुरुंगात जाणार त्या तारखा आम्ही सांगू’; संजय राऊत विरोधकांवर बसरले
१,९१,४९७ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ६ कोटी २८ लाख ४३ हजार ७९२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६ लाख १२ हजार ९६५ (१०.५२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९१ हजार ४९७ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ९१९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.