पोटनिवडणुकांमधील पराभवावरून काँग्रेसने भाजपव हल्लाबोल केला आहे. पोटनिवडणुकांचे निकाल पाहता जनतेचा मूड बदलत आहे. आणि आता भाजपची उलट गणती सुरू झाली आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे.
पोटनिवडणुकीतील भाजपच्या पराभवावरून काँग्रेसने पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला आहे. मोदीजी, आतातरी राजहट्ट सोडा, ३ काळे कृषी कायदे मागे घ्या आणि पेट्रोल डिझेल, गॅसची लूट बंद करा. अहंकार सोडा, असं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला हे ट्विटमध्ये म्हणाले.
himachal pradesh bypoll result : हिमाचलमध्ये पोटनिवडणुकीत भाजपला झटका! चारही जागांवर काँग्रेस विजयी
दरम्यान, पोटनिवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवानंतर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी ट्विट केलं आहे. पुढील वर्षी म्हणजे २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा नक्कीच विजय होईल. त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील, असं मुख्यमंत्री ठाकूर यांनी म्हटलं आहे.