भाजपने प्रचारासाठी मोठ्या नेत्यांना आणि मंत्र्यांना मैदानात उतरवले. पण भाजपला यश मिळाले नाही. भाजपने गेल्या निवडणुकीवेळी जुबल-कोटखई ही विधानसभेची जागा जिंकली होती. तिथेही भाजपचा पराभव झाला. तसंच अर्की आणि फतेहपूर या विधानसभेच्या दोन जागांवरही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
भाजपचा धुव्वा! दादरा-नगर हवेलीत सेनेचा भगवा फडकला, कलाबेन डेलकर विजयी
जुबल-कोटखईमध्ये काँग्रेसच्या रोहित ठाकूर यांचा विजय झाला आहे. भाजप उमेदवार नीलम सेरईक यांना २,६०० मते मिळाल्याने त्यांचं डीपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे. त्यांच्यापेक्षा जास्त म्हणजे ६,२९३ इतकी मत अपक्ष उमेदवार चेतन सिंह ब्रागता यांना मिळाली आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर ही आकडेवारी आहे.
LIVE पोटनिवडणूक निकाल : तीन लोकसभा आणि २९ विधानसभा जागांचा निकाल
हिमाचल प्रदेशातील सफरचंदाचे केंद्र म्हणून जुबल-कोटखई हा मतदारसंघ ओळखला जातो. भाजप आमदार नरिंदर ब्रागता यांचे जूनमध्ये निधन झाल्याने ही पोटनिवडणूक झाली. पण या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला.
फतेहपूर हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. काँग्रेस उमेदवार भवानी सिंह पठीयानी हे या निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यांचे वडील आमदार सुजन सिंह पठीयानी यांचे जानेवारीत निधन झाले होते. त्यांची जागा राखण्यात भवानी सिंह यांना यश आलं आहे. भाजपच्या बलदेव सिंह यांचा त्यांनी पराभव केला.
Assam: राजीनामा देत भाजपमध्ये दाखल होणाऱ्या उमेदवाराकडून काँग्रेसला पराभवाचा जोरदार झटका
अर्की विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे संजय अवस्थी हे विजयी झाले. त्यांनी भाजपच्या रतन सिंह पाल यांचा ३२१९ मतांनी पराभव केला. या मतदारसंघातून सहा वेळा निवडून गेलेले मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे जुलैमध्ये निधन झाले. यामुळे या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली.
मंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार राम स्वरुप शर्मा यांचे मार्चमध्ये निधन झाले. पण काँग्रेसने भाजपची ही जागा जिंकली आहे. भाजपने कारगिल वॉर हिरो ब्रिगेडियर (निवृत्त) कुशाल चंद ठाकूर आणि काँग्रेसने प्रतिभा सिंह यांना उमेदवारी दिली होती. प्रतिभा सिंह या वीरभद्र सिंह यांच्या पत्नी आहेत.