फडणवीसांचा ‘बॉम्ब’ फोडण्याचा इशारा; बारामतीत जाऊन मुख्यमंत्री म्हणाले…


हायलाइट्स:

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारामतीमध्ये
  • पवार कुटुंबाच्या कामाचं केलं कौतुक
  • देवेंद्र फडणवीसांना हाणला खोचक टोला

मुंबई: ड्रग्ज प्रकरणावरून सध्या सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर व इशाऱ्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज जोरदार फटकेबाजी केली. नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिवाळीनंतर ‘बॉम्ब’ फोडण्याचा इशारा दिला आहे. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना टोला हाणला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज बारामतीमध्ये आहेत. तिथं त्यांच्या हस्ते अटल इनक्युबेशन सेटरचं उद्घाटन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्यातील चालू घडामोडींवर अप्रत्यक्ष टोलेबाजी केली. ‘दिवाळी सुरू झाली आहे. काही लोक म्हणतात, आम्ही फटाके फोडणार. फटाके जरूर फोडा. पण धूर काढू नका, अशी कोपरखळी मुख्यमंत्र्यांनी हाणली. ‘करोना संपलेला नाही. त्या अनुषंगानं मी हे बोलतोय,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

वाचा: ‘आर्यन खानला अटक झाल्यानंतर नवाब मलिक का बोलताहेत? आधीच का बोलले नाहीत?’

‘राजकारण करायला हरकत नाही. राजकारणात टीकाकारही असले पाहिजेत. आम्हीही कधी काळी राष्ट्रवादी काँग्रेसचे टीकाकार होतो, पण चांगल्या कामात राजकारण आणलं जाऊ नये. चांगल्या कल्पनांना बळ देण्याची भूमिका असायला हवी. पटत नाही म्हणून एखाद्याच्या कामात विघ्न आणणं योग्य नाही. पण आपल्याकडं विघ्नसंतोषी लोक आहेत, त्याला काय करणार,’ असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी हाणला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी पवार कुटुंबाच्या कामाचं कौतुक केलं. ‘संपूर्ण पवार कुटुंब विकासकामात रंगलंय. सगळे मनापासून काम करतात. पवार साहेबांसारखा तरुण नेता आपल्यासोबत आहे. महाराष्ट्राचं आणि या संस्थांचं नेतृत्व करताहेत हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.

नारायण राणेंना टोला

‘राजकारणात उबवणी केंद्र असायला पाहिजे. आम्हीही उबवणी केंद्रे निर्माण केली होती आणि नको ती अंडी उबवली. आता त्याचं काय झालं ते तुम्ही पाहातच आहातच, असा टोला मुख्यमंत्र्यांनी नारायण राणे यांचं नाव न घेता हाणला.

वाचा: परमबीर सिंग गायब होण्यामागे कोण?; भाजपनं मांडली ‘ही’ थिअरीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: