एका प्रत्यक्षदर्शीनं दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी काबूलमध्ये एका सैन्य रुग्णालयाबाहेर गोळीबारानंतर एक मोठा स्फोट झाला. त्यानंतर एएफपी पत्रकारांना दुसरा स्फोटही पाहायला मिळाला.
स्फोटाच्या स्थळावर त्यानंतर बराच वेळ गोळीबाराचा आवाज ऐकू येत राहिला. या स्फोटात आणि गोळीबारात जीवितहानी झाली किंवा नाही हे अद्याप समोर समजू शकलेलं नाही.
सरदार मोहम्मद दाऊद खान रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाला तेव्हा ते रुग्णालयातच होते. पहिल्या प्रवेशद्वाराजवळून एक मोठा स्फोट कानी पडला. त्यानंतर सर्वांना सुरक्षित रुममध्ये हलवण्यात आलं. याच दरम्यान उपस्थितांना गोळीबाराचा आवाजही ऐकू आला, असं या डॉक्टरांनी म्हटलंय.
‘इस्लामिक स्टेट’शी निगडीत दहशतवादी संघटनांकडून हा स्फोट घडवून आणला गेल्याची प्राथमिक माहिती हाती येतेय.