पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

तिसंगी / शंकरराव पवार - महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रा.आर. एस.चोपडे यांनी लिहिलेल्या 'प्रेमाचे झरे' हे आत्मवृत्त पुस्तक समाजाला सुसंस्कृत बनविण्यासाठी उपयुक्त ठरेल असे मत वाळवा संकुलाचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी व्यक्त केले.
झरे ता.आटपाडी येथे प्रा.आर.एस.चोपडे यांनी लिहिलेल्या "प्रेमाचे झरे" या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा कार्यक्रमाच्या वेळी मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर,सांगोल्याचे युवा नेते डॉ.बाबासाहेब देशमुख,साहित्यिक सुभाष कवडे, उपसभापती नारायण चवरे आदीसह संस्थेचे सर्व पदाधिकारी,सल्लागार,संचालक मंडळ,सर्व शाखांचे मुख्याध्यापक,शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच झरे, कुरुंदवाडी, पारेकरवाडी,पडळकरवाडी गावचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
झरे पंचक्रोशीच्यावतीने आर.एस.चोपडे सर व सौ.यू.आर. चोपडे या उभयतांचा भव्य नागरी सत्कार आ.गोपीचंद पडळकर व सर्व सरपंच यांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रातील पन्नास वर्षाच्या काळात सुवर्णमय कामगिरीबद्दल करण्यात आला.
यावेळी प्रा.आर.एस.चोपडे लिखित “प्रेमाचे झरे” या पुस्तकाचे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती, कै.बँ.टी.के.शेंडगे,राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
यावेळी बोलताना वैभव नायकवडी म्हणाले की, नागनाथअण्णांनी नेहमीच माझ्यापेक्षा जास्त प्रेम चोपडे सरांवर केले.तालुक्याच्या भौतिक विकासा मध्ये अहिल्या शिक्षण संस्थेचे पर्यायांने चोपडे सरांचा सिहांचा वाटा असल्याचे मत व्यक्त करून श्री.चोपडे दापत्यांचे काम समाजासाठी आदर्शवत राहिल्याचे मत व्यक्त केले.
प्रस्ताविक भाषणात गोपीचंद पडळकर म्हणाले की, प्रेमाचे झरे हे पुस्तक सर्वांना दिशादर्शक नक्कीच .मागासलेल्या समाजामध्ये शैक्षणिक क्रांती करण्यात अहिल्या शिक्षण संस्थेचा सिंहाचा वाटा असून मी या संस्थेचा व सरांचा विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.प्रशासन कसे चालवायाचे याचे उत्तम उदाहरण आर.एस. चोपडे सर आहेत. झरे परिसराच्या जडणघडणीत सरांची भूमिका व कार्य आदर्शवत आहे.
जेष्ठ साहित्यीक सुभाष कवडे म्हणाले की, प्रेमाचे झरे हे आत्मचरित्र चोपडे सरांचे नसून अहिल्या शिक्षण संस्थेच्या घोडदौडीचा इतिहास आहे.हे पुस्तक विद्यार्थी,पालक,समाज विशेषता शिक्षण क्षेत्राला दिशा देण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर सत्काराला उत्तर देताना प्रा.चोपडे म्हणाले की,अहिल्या शिक्षण संस्था व झरे पंचक्रोशी यांच्याशी असलेला ऋणानुबंध व्यक्त करण्यासाठी त्याचबरोबर माझ्या जीवनात आलेले तीन विठ्ठल कै.बँ.टी.के.शेंडगे,कै. पदमभूषण क्रांतीवीर नागनाथअण्णा, कै.आ. गणपतराव देशमुख आदी लोकांचे प्रेम,मार्गदर्शन यामुळेच मी सहकारी बांधवांच्या मदतीने अहिल्या शिक्षण संस्थेला महाराष्ट्राच्या पटलावर नेऊ शकलो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाशन सोहळा समितीचे अध्यक्ष प्राचार्य अशोक पडळकर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास वाघमारे व डी.एन.वाघमारे यांनी केले. आभार डॉ.स्वप्निल चोपडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झरे शैक्षणिक संकुलाचे सर्व सेवक व पुस्तक प्रकाशन सोहळा समितीने विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमापूर्वी सकाळी झरे गावातून प्रा.आर.एस. चोपडे सर यांची गावातून सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी त्यांच्या सोबत जेष्ठ सल्लागार ए.एम.वाघमोडे होते. या मिरवणूकी साठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.एकूणच या भागाचा शिक्षणातून कायापलट करून झरे ला शैक्षणिक केंद्र बनविण्यात श्री चोपडे सर व सौ.चौपडे मँडम यांचे योगदान मोलाचे होते.