राजीनामा देत भाजपमध्ये दाखल होणाऱ्या उमेदवाराकडून काँग्रेसला पराभवाचा जोरदार झटका!


हायलाइट्स:

  • मरियानी विधानसभा मतदारसंघाचा निकाल
  • माजी सहकाऱ्यानंच भेदला काँग्रेसचा अभेद्य किल्ला
  • काँग्रेसचा ३० वर्षांपासूनचा अभेद्य किल्ला फोडला
  • भाजप उमेदवार रुपज्योति कुर्मी यांचा विजय

गुवाहाटी : देशात नुकत्याच पार पडलेल्या तीन लोकसभा मतदारसंघ तर २९ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर होतोय. यात आसाम राज्यातील पाच विधानसभा मतदारसंघांचाही समावेश आहे. यापैंकीच मरियानी विधानसभा मतदारसंघाचा निकाल काँग्रेससाठी एखाद्या धक्क्याहून कमी नाही. विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसला मरियानी मतदारसंघाच्या रुपात गेल्या ३० वर्षांपासूनचा अभेद्य किल्ला गमवावा लागलाय. उल्लेखनीय म्हणजे, काँग्रेसच्या एका माजी सहकाऱ्यानंच पक्षाला हा पराभव धक्का दिलाय.

मरियानी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रुपज्योति कुर्मी यांचा विजय निश्चित झालाय. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला तब्बल ४० हजारहून अधिक मतांनी पछाडलंय.

रुपज्योती कुर्मी हे काही महिन्यांपूर्वीपर्यंत काँग्रेसचे उमेदवार होते. पदाचा राजीनामा देत ते भाजपमध्ये सहभागी झाले. मरियानी हा मतदारसंघात गेल्या ३० वर्षांपासून काँग्रेसचाच दबदबा दिसून आला होता. मात्र कुर्मी यांनी काँग्रेसचा हा गड भेदून इथं आपलं वर्चस्व सिद्ध केलंय.

भाजप उमेदवार रुपज्योति कुर्मी


LIVE पोटनिवडणूक निकाल : तीन लोकसभा आणि २९ विधानसभा जागांचा निकाल

खरेदीला जोर! ‘जीएसटी’ गोळा करण्यात महाराष्ट्र टॉपवर, पहिल्या पाचात यूपीचाही नंबर

आसाममधल्या तीन जागांवर भाजपकडून उमेवदवार उभे करण्यात आले होते तर दोन जागा सहकारी यूपीपीएल पक्षाला देण्यात आल्या होत्या.

आसाममधल्या गुसाईगाव, भवानीपूर, तामूलपूर, मरियानी आणि थोवरा या पाच जागांवर ३० ऑक्टोबर रोजी मतदान पार पडलं होतं. जवळपास ८ लाख मतदात्यांपैंकी ७३.७७ टक्के नागरिकांनी आपल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर केला होता.

यापैंकी गुसाईगाव आणि तामूलपूरमध्ये आमदारांच्या निधनानंतर पोटनिवडणूक घ्यावी लागली. तर उरलेल्या भवानीपूर, मरियानी आणि थोवराच्या आमदारांनी भारतीय जनता पक्षात सहभागी झाल्यानंतर राजीनामा दिला होता. त्यामुळे इथेही पोटनिवडणूक घेण्यात आली.

Firecrackers: फटाक्यांवर पूर्णतः बंदी आणता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय
Sameer Wankhede: समीर वानखेडेंकडून आयोगासमोर जातीची कागदपत्रे सादरSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: