sanjay raut criticizes bjp leaders: ‘तुम्ही कधी तुरुंगात जाणार त्या तारखा आम्ही सांगू’; संजय राऊत विरोधकांवर बसरले


हायलाइट्स:

  • आता अनिल परब यांना अटक होईल असे सांगणारे xxx (मूर्ख) आहेत- खासदार संजय राऊत.
  • असे सांगणारे तुम्ही कोण आहात?, तुमच्या बापाच्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत का?- खासदार राऊत
  • तुम्ही कधी तुरुंगात जाल याच्या तारखा आम्ही सांगू- खासदार राऊत.

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर आता महाविकास आघाडीचे दुसरे मंत्री अनिल परब यांना अटक होईल, असे विरोधकांकडून बोलले जात आहे. या मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. असे सांगणारे लोक xxx (मुर्ख आहेत), माझ्या भाषेत सांगायचे झाल्यास ते लोक xxx (मूर्ख) आहेत. हा शब्द बाळासाहेबांनी देखील वापरला आहे आणि त्याचा अर्थ मूर्ख असा होतो, अशा शब्दात राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. (shiv sena mp sanjay raut criticizes bjp leaders on speculation of arrest of anil parab)

‘तुम्ही कधी तुरुंगात जाणार त्या तारखा आम्ही सांगू’

राऊत पुढे म्हणाले की, असे सांगणारे तुम्ही कोण आहात?, तुमच्या बापाच्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत का?, हा अटक होईल, तो अटक होईल… तुम्ही आता स्वत:ला सांभाळा. तुम्ही कधी तुरुंगात जाणार आहात, त्या तारखा आम्ही सांगू, आम्हाला माहीत आहेत. पण या पातळीवर उतरायचं का, असे सांगत आम्ही या पातळीवर उतरणार नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘आमच्याही हातात दगड असू शकतात’; खासदार संजय राऊत यांचा भाजपला इशारा

महाराष्ट्राची एक प्रतिष्ठा आहे, परंपरा आहे. महाराष्ट्राची संस्कृती आम्हाला जपायची आहे. हे बोंबलणारे लोक सगळे बाहेरून आलेले लोक आहेत. भारतीय जनता पक्षात हे जे लोक आहेत ते काय भारतीय जनता पक्षाचे मूळचे लोक आहेत का?, असा सवालही राऊत यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत बोलत होते.

‘हे हौशे, नवशे, गवशे, नाचे बाहेरून आले आहेत’

राऊत पुढे म्हणाले की, सुधीर मुनगंटीवार, आशीष शेलार, स्वत: देवेंद्र फडणवीस हे भाजपचे मूळचे लोक आहेत. आम्ही त्यांना उत्तरे देऊ ना… हे हौशे, नवशे, गवशे, नाचे बाहेरून आले आहेत आणि भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवून आम्हाला दाखवत आहेत. यांना भारतीय जनता पक्ष काय माहिती आहे? आम्ही अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत काम केलेले लोक आहोत. आम्ही लालकृष्ण आडवाणींसोबत काम केलेले लोक आहोत. मुरली मनोहर जोशींबरोबर काम केलेले लोक आहोत. भारतीय जनता पक्षाशी आमचा संबंध जुना होता आणि आहे. भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही कधी आलात?

क्लिक करा आणि वाचा- ‘पाकिस्तानात बॉम्ब कधी फुटणार?’; मुख्यमंत्री ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार

आता मी नावे घेत नाही. पण आयुष्यभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पखाल्या वाहिल्यात, काँग्रेसच्या पखाल्या वाहिल्यात, मनसेमध्ये राहिला आहात. इकडून तिकडे तिकडून इकडे नौटंक्या करत असता. तुम्ही भारतीय जनता पक्षाविषयी बोलू नका. तुम्ही आम्हाला सांगू नका. आम्हाला माहिती आहे संघ परिवार काय आहे, भारतीय जनता पक्ष काय आहे. मूळचा भाजप काय आहे, शिवसेना काय आहे. तुम्ही कशाला आम्हाला सांगता?, तुम्ही कोण आहात?, असे राऊत यांनी म्हटले आहे.

उद्या भाजपचं सरकार नसेल तेव्हा तुम्ही त्या पक्षात नसाल. २०२४ नंतर आज जे बोलत आहेत त्यातील एकही माणून भाजपत नसेल, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

क्लिक करा आणि वाचा- नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं दिसतंय, त्यांचा राजीनामा घ्या: दरेकर भडकले

नवाब मलिक यांचा सिनेमा हिट आहे

सध्या सुरू असलेला नवाब मलिक यांचा सिनेमा हीट आहे. सुपरहीट म्हणतात ना तसा आहे. अजून नवाब मलिकांच्या सिनेमाचा इंटरव्हल संपलेला नाही, असे सूचक व्यक्तव्य करत राऊत यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: