COP26 Summit: बोरिक जॉन्सन यांनी स्वीकारलं पंतप्रधान मोदींचं भारतभेटीचं निमंत्रण


हायलाइट्स:

  • नरेंद्र मोदी आणि ब्रिटन पंतप्रधान बोरिक जॉन्सन यांची भेट चर्चेत
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पुन्हा एकदा बोरिक जॉन्सन यांना भारतभेटीचं आमंत्रण
  • करोना संक्रमणकाळात दोनदा बोरिक जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द

ग्लासगो : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतात येण्याचं दिलेलं आमंत्रण ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वीकारलंय. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी मंगळवारी ही माहिती दिलीय. परिस्थितीनं सुधारताच युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आपला भारत दौरा निश्चित करतील, असं श्रृंगला यांनी म्हटलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी COP26 हवामान शिखर संमेलनाच्या निमित्तानं बोरिस जोन्सन यांना भारतात येण्याचं आमंत्रण दिलं होतं. यावेळी, उभयतांत ग्रीन हायड्रोजन, अक्षय आणि स्वच्छ तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था आणि संरक्षण यासारख्या क्षेत्रात द्वीपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या मुद्यावर चर्चा झाली.

करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर बोरिस जॉन्सन यांना तब्बल दोन वेळा भारताचा दौरा टाळावा लागलाय. जॉन्सन यापूर्वी जानेवारी २०२१ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं प्रमुख पाहुणे म्हणून भारतात उपस्थित राहणार होते. परंतु, करोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा रद्द करण्यात आला.

त्यानंतर एप्रिल महिन्यात त्यांनी भारताचा दौरा आखला. परंतु, पुन्हा एकदा त्यांना हा दौरा रद्द करावा लागला. करोना संक्रमणकाळात तब्बल दोन वेळा बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि बोरिस जॉन्सन या नेत्यांत ही पहिलीच समोरा-समोर भेट ठरली.

स्कॉटलंडमधील ग्लासगो येथील आंतरराष्ट्रीय हवामान शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी दाखल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केलं. यावेळी बोरिस यांच्यासह संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनीही पंतप्रधान मोदींशी हितगुज साधलं.

ग्लासगो येथील हवामान परिषदेत सोमवारी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस मनमोकळ्या गप्पा मारतानाही दिसले.

PHOTO : पंतप्रधान मोदींकडून पोप फ्रान्सिस यांना भारतात येण्याचं निमंत्रण

PM Modi in Rome: इटलीत ‘पियाजा गांधी’तल्या पुतळ्यासमोर पंतप्रधान मोदी नतमस्तक; भारतीयांशी संवाद
‘विकसित देशच अपयशी’
‘पर्यावरण संरक्षणासाठी विकसनशील देशांना प्रतिवर्ष १०० अब्ज डॉलरचं सहाय्य करण्यात सन २००९पासून विकसित देशांना अपयश आलं’, अशा शब्दांत केंद्रीय पर्यावरणमंत्री भुपेंदर यादव यांनी रविवारी आंतरराष्ट्रीय हवामान परिषदेत संपन्न राष्ट्रांना सुनावलं. ‘बेसिक’ गटाच्या देशांतर्फे म्हणजेच ब्राझील, दक्षिण आफ्रिका, भारत व चीन यांच्यातर्फे यादव यांनी विकसनशील देशांची बाजू मांडली. ‘सन २००९ पासून विकसनशील देशांनी हवामान संरक्षणासाठी महत्त्वाची पावलं उचलली आहेत. मात्र या देशांना आर्थिक सहाय्य करण्यात विकसित देशांकडून प्रयत्न होत नसून, ते अस्वीकारार्ह आहे’, असं यादव म्हटलं.

‘हवामान परिषद एक वर्षाच्या खंडानंतर होत आहे. तरीही विकसनशील देशांनी त्यांचे राष्ट्रीय योगदान पूर्ण केले आहे. विकसनशील देशांना भविष्यात कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अधिक वेळ आणि धोरण आखण्याची संधी देण्याची गरज आहे. पर्यावरण रक्षणासाठी परिषदेतील सहभागी सदस्य राष्ट्रांनी मोठे लक्ष्य ठेवण्याची आवश्यकता आहे’, असंही त्यांनी म्हटलं. यावेळी यादव यांनी पॅरिस कराराच्या मूळ ढाच्याबद्दलही चर्चा केली आणि उत्सर्जन कमी करण्याचं राष्ट्रीय लक्ष्य ठरवण्यासाठी प्रत्येक देशाला स्वातंत्र्य असायला हवं, असा मुद्दाही त्यांनी मांडला.

पृथ्वीच्या तापमानवाढीची तीव्रता कमी करण्याचे दीर्घकालीन लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रत्येक देशाला तातडीनं योगदान द्यावं लागेल, हे आधुनिक विज्ञानानं सिद्ध केलंय. विकसित देशांनी कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करणं आणि विकसनशील देशांना आर्थिक साह्य देणं गरजेचं आहे, असंही यादव यांनी म्हटलंय. ‘कार्बन क्षेत्रातील खासगी उद्योगांच्या सहभागानं उत्सर्जन कमी करण्याचं ध्येय अधिक सोपं होऊ शकतं’, असा मुद्दाही त्यांनी मांडला.

पंतप्रधान भारताची भूमिका मांडणार

हवामान परिषदेला सुमारे २०० राष्ट्रांचे प्रमुख-प्रतिनिधी उपस्थित आहेत. कार्बन उत्सर्जनाबाबत भारत, चीन या परिषदेत कोणती भूमिका घेतात, याकडं जगाचं लक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या आपल्या भाषणात भारताची भूमिका मांडणार आहेत.

खरेदीला जोर! ‘जीएसटी’ गोळा करण्यात महाराष्ट्र टॉपवर, पहिल्या पाचात यूपीचाही नंबर
patna serial blasts : नरेंद्र मोदींच्या हुंकार रॅलीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या ४ दोषींना फाशीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: