मुंबई क्रुझ प्रकरणः काँग्रेसने भाजपवर केला धक्कादायक आरोप


हायलाइट्स:

  • मुंबई ड्रग्ज क्रुझ प्रकरणात धक्कादायक वळण
  • काँग्रसने भाजपवर साधला निशाणा
  • अतुल लोंढे यांचा भाजपवर आरोप

नागपूरः मुंबई क्रुझ पार्टीत देशात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आलं आहे. यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या भाजपचा हात आहे. भाजपच्या सत्तेच्या अधिकाराखाली हा ड्रग्जचा वापर मोठ्या प्रमाणात देशात चालला आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. नागपुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अतुल लोंढे यांनी केलेल्या या आरोपांमुळं क्रुझ पार्टी प्रकरणाला वेगळं वेळण लागण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली आहे. तसंच, गुजरात येथील मुंद्रा ड्रग्ज प्रकरणावरुनही धक्कादायक खुलासे केले आहेत. अतुल लोंढे यांनी तसे पुरावेही सादर केले आहेत. मुंद्रा बंदरावर २१ सप्टेंबरला तीन हजार किलोचे ड्रग्ज पकडले गेले. मुंद्रावर २१ संप्टेबरला पकडले गेले. तर, मनीष भानुशाली हे गुजरातमध्ये २२ सप्टेंबरला होते. त्यांची आणि गुजरातचे मंत्री किरीट सिंह राणा यांची भेटही झाली. एका वृत्तपत्राला मुलाखत देताना मुंद्राचा उल्लेख होताच ते किरीट सिंह राणा बोलताना थांबले. तो माईक लगेच काढण्यात आला, असा आरोप लोंढे यांनी केला आहे.

शिवाय, मनिष भानुशाली याने ३ ऑक्टोबरला एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात तो काम हो गया असं बोलताना आढळतोय. या सगळ्या प्रकरणात एक इनोव्हा गाडी आहे. ती गाडी रवींद्र कदम यांच्या नावावर आढळली. त्याचा पत्ता कराडचा आहे. ही गाडी गुजरातला गेलेली आहे. तिथे सॅम डिसोझा यांच्यात ५० लाखांची देवाण- घेवाण झाली असल्याची आमची माहिती आहे. त्या गाडीत तेच पैसे गेले. तीच गाडी गुजरातला गेली. तीच गाडी एनसीबी ऑफिसला होती. रवींद्र कदम हा या प्रकरणातला मास्टरमाइंट आहे की याचा वापर झाला आहे. ही गाडी तिथे कशी गेली. याचा शोध घेतला पाहिजे. रविंद्र कदमला पकडलं तर हे सगळं समोर येईल, असा खुलासा लोंढे यांनी केला आहे. तसंच, आम्ही त्या गाडीचा शोध घेतला असता ती गाडी ज्याच्या नावावर रजिस्टर आहे. त्या अनुषगांने आम्हाला कराडचा पत्ता मिळाला पण त्या पत्त्यावर रविंद्र कदम राहत नाही, असंही लोंढे यांनी म्हटलं आहे.

किरण गोस्वामी २२ सप्टेंबरला गुजरातमध्ये होते. याचाच अर्थ असा आहे की या देशात मोठ्या प्रमाणा ड्रग्ज आले आणि हे ड्रग्ज लपवण्यासाठी हिंदु- मुस्लीम असा घाट घालून लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला गेला. सातत्याने मुंबई ड्रग्ज प्रकरणी बोलण्यात येतं होतं. मुंद्रा प्रकरणातील कारवाई ही जगातली सगळ्यात मोठी कारवाई होती. त्यातून लक्ष वळवण्यासाठी हा घाट घातला, असा आरोपही त्यांनी केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: