हायलाइट्स:
- अजित पवारांच्या अडचणीत वाढ
- आयकर विभागाकडून पवारांना नोटीस
- ठाकरे सरकारला दुसरा धक्का
मागील काही दिवसांपासून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीय हे आयकर विभागाच्या रडारवर आहेत. अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी व पार्थ पवार यांच्या कार्यालयातही आयकर विभागानं छापेमारी केली होती. त्यानंतर आज आयकर विभागाकडून अजित पवारांना नोटिस देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
वाचाः चुकीला माफी नाही; देशमुखांच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
या कारवाईअंतर्गंत अजित पवारांशी संबंधित कोट्यवधींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाची कारवाई झाली असून ९० दिवसांच्या कालावधीत प्रॉपर्टी बेनामी नसल्याची सत्यता सिद्ध करावी लागणार आहे. आयकर विभागानं अजित पवार यांच्याशी निगडीत ५ संपत्तीवर जप्ती आणण्याचे आदेश दिले असून ही संपत्ती जवळपास १ हजार कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे.
वाचाः अनिल देशमुखांना ईडीकडून अटक; नितेश राणेंच्या ‘या’ ट्वीटचा नेमका अर्थ काय?
कोणत्या मालमत्तांवर कारवाई?
जरंडेश्वर साखर कारखाना- (जवळपास ६०० कोटी)
दक्षिण दिल्लीतील फ्लॅट- (जवळपास २० कोटी)
पार्थ पवार यांचे मुंबईतील कार्यालय -( जवळपास २५ कोटी)
गोव्यातील रिसॉर्ट- ( जवळपास २५० कोटी)
राज्यातील वेगवेगळ्या २७ जिल्ह्यातील जमीनी -( जवळपास ५०० कोटी)
दरम्यान, अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाच्या रडारवर आहेत. मागील महिन्यात आयकर विभागानं दोन रिअल इस्टेट ग्रुप आणि अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी धाड टाकली होती. त्यानंतर जवळपास १८४ कोटी बेनामी मालमत्ता उघड झाली होती. आयकर विभागानं ७ ऑक्टोबर रोजी ७० हून अधिक ठिकाणी धाड टाकली होती. यावेळी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयात व अजित पवारांच्या बहिणींच्या कंपन्यांवरही छापा मारला होता.
वाचाः ठाकरे सरकारला मोठा धक्का; अनिल देशमुख यांच्या अटकेआधी नेमकं काय घडलं?