amruta fadnavis criticizes malik: अमृता फडणवीस नवाब मलिकांवर संतापल्या; म्हणाल्या, ‘बेनकाब नवाब भी होता हैं’


मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्जच्या खेळाचा मास्टरमाइंड असल्याचा खळबळजनक आरोप केल्यानंतर फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मलिक यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही मर्द आहात ना?, मग देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करा, मला मध्ये आणू नका, असे म्हणत नवाब एकदिवस बेनकाब होतील, असा हल्लाबोल अमृता फडणवीस यांनी केला आहे. (amruta fadnavis criticizes minister nawab malik after his allegations on devendra fadnavis)

भाजपाचे ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांशी संबंध असल्याचा आरोप करत नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा फोटो ट्विट केला आहे. फोटोतील व्यक्ती जयदीप राणा असून राणा यांचा ड्रग्ज व्यवसायाशी संबंध असल्याचा आरोप मलिक यांनी केला. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांच्या १९ बंगल्यांबद्दल बोला’; भाजपचे मलिकांना आव्हान

मलिक हे माझ्यावर आरोप करत आहेत, तसेच ते माझ्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत आहेत. मात्र आम्ही दोघे स्वतंत्र व्यक्ती आहोत. आमची वेगळी ओळख आहे. मी सामाजिक कार्यकर्ता असून एक बँकर आहे, तसेच मी एक गायिकाही आहे. माझी ही ओळख मी जपलेली आहे, असे सांगतानाच अमृता फडणवीस यांनी जर माझ्या अंगावर कुणी आले, तर मी त्याला सोडणार नाही. कारण, मी खऱ्याची साथ सोडत नाही आणि खोट्याची साथ देणाऱ्यालाही मी सोडत नाही, असे आव्हानच अमृता फडणवीस यांनी दिले आहे.

मलिक यांच्यावर आरोप करताना त्या म्हणाल्या की हे सगळे जाणीवपूर्वक केले जात आहे. आमच्याकडे असे काहीच नाही जे नवाब मलिक उघड करू शकतात, असे सांगत आमच्याकडे भूखंड, साखर कारखाने असे काहीच नाही, आम्ही कोणाला घाबरत नाही, असा टोलाही त्यांनी नवाब मलिक यांना लगावला.

क्लिक करा आणि वाचा- ‘आमच्याही हातात दगड असू शकतात’; संजय राऊत यांचा भाजपला इशारा

‘बेनकाब नवाब भी होता है’

नवाब मलिकांवर प्रहार करताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, कोण कोणाच्या पाठीशी आहे हे नवाब मलिक यांनी त्यांच्या जावयाला विचारावे. बेनकाब नवाब भी होता है, और वह जरूर होगा. थोडा काळ जावा लागेल, असेही त्या पुढे म्हणाल्या. जेव्हा एखाद्यामध्ये नकारात्मकता आलेली असते तेव्हा त्याला सर्व काही तसेच दिसते, त्याच्या मनात खराब विचार येतात तेव्हा त्याला सगळं खराब दिसतं आणि तो खराब करण्याचा प्रयत्न करत असतो, अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी मलिकांवर हल्लाबोल केला आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘पाकिस्तानात बॉम्ब कधी फुटणार?’; मुख्यमंत्री ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार

मलिक यांना आव्हान देत अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या की, तुम्ही मर्द आहात ना, तर मग थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधा, मला मध्ये आणू नका. मी माझे केवळ विचार मांडते आणि एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून ते करत राहणार आहे. त्यापासून मला मात्र कुणीही थांबवू शकत नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: