पराभवानंतर विराटच्या कुटुंबियांना धमकी; या खेळाडूचा धक्कादायक दावा


दुबई: टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा दुसऱ्या लढतीत न्यूझीलंडने ८ विकेटनी पराभव केला. या पराभवामुळे भारतीय संघाचे सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता फारच कमी झाली आहे. याआधी भारताचा पाकिस्तानने १० विकेटनी पराभव केला होता. भारतीय संघाच्या या खराब कामगिरीनंतर खेळाडूंवर सोशल मीडियातून टीका होत आहे. अशात एका खेळाडूने धक्कादायक दावा केला आहे.

वाचा- BCCIचा डाव उलटा पडला; वर्ल्डकप सुरु होण्याआधीच टीम इंडियाची पराभवाची तयारी

भारतीय संघाच्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने सांगितले की, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या कुटुंबियांना धमकी दिली जात आहे. इंझमामने हा धक्कादायक दावा युट्यूब चॅनलवर केलाय. हा एक खेळ आहे आणि खेळात जय-पराजय होत असतो. मी टीव्ही समोर बसलो होतो आणि असे ऐकण्यास मिळाले की विराट कोहलीच्या मुलीला धमकी दिली जात आहे. विराटचे नेतृत्व किंवा त्याची फलंदाजी आवडली नाही तर तुम्ही त्यावर टीका करू शकता, नाराजी व्यक्त करू शकता. पण मला वाटते की कुटुंबावर कोणी जाऊ नये.

वाचा- जिंकणार तरी कसे? दोन सामन्यात फक्त २ विकेट घेतल्या

काही दिवसांपूर्वी भारताचा जलद गोलंदाज मोहम्मद शमी सोबत देखील असे झाले होते. खेळात तुम्ही कधी चांगली कामगिरी करता कधी खराब. त्याला खेळ म्हणून पाहिले जावे. मला फार वाईट वाटते. असे कधीच होऊ नये. भारतीय संघाच्या फलंदाजी, गोलंदाजी आणि संघ निवडीवर तुम्ही टीका करू शकता. पण पराभव देखील पचवता आला पाहिजे, असे इंझमाम म्हणाला.

वाचा- विराटने खेळाडूंसोबत अस करायल नको होत; वर्ल्डकपमध्ये केली मोठी चूक

न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना भारताला फक्त ११० धावा करता आल्या. आघाडी आणि मधळ्या फळीतील फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले. रविंद्र जडेजा (नाबाद २६) आणि हार्दिक पंड्या (२३) हे दोन फलंदाज वगळता अन्य कोणाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. विजयाचे छोटे लक्ष्य न्यूझीलंडने २ विकेटच्या बदल्यात १४.३ षटकात पार केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: