केविन पीटरसननं दिला भारतीय खेळाडूंना आधार; हिंदी भाषेत ट्विट करून म्हणाला…


मुंबई : टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. भारताला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताचा पहिल्या सामन्यात पाकिस्तानने १० गडी राखून पराभव केला होता आणि त्यानंतर रविवारी (३१ ऑक्टोबर) न्यूझीलंडकडूनही मार खावा लागला आहे. या पराभवामुळे भारतीय चाहते खूप निराश झाले आहेत. त्यांना भावनिक आधार देण्यासाठी इंग्लंडचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज केविन पीटरसनने हिंदीत ट्विट करून भारतीय खेळाडूंना आणि चाहत्यांना प्रोत्साहन दिले आहे.

वाचा-विराटने खेळाडूंसोबत अस करायल नको होत; वर्ल्डकपमध्ये केली मोठी चूक

पीटरसनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘खेळात एक विजेता आणि एक पराभूत होणारा खेळाडू असतो. कोणताही खेळाडू हरण्यासाठी बाहेर येत नाही. आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे, हा सर्वात मोठा सन्मान आहे. कृपया लक्षात घ्या की, खेळामधील लोक रोबोट नाहीत आणि त्यांना नेहमीच समर्थनाची आवश्यकता असते.’

वाचा- पराभवानंतर विराटच्या कुटुंबियांना धमकी; या खेळाडूचा धक्कादायक दावा

वाचा- Video : भारताच्या पराभवानंतर वसीम अक्रम-वहाबचा जबरदस्त डान्स; आफ्रिदी-अख्तरनेही काढले चिमटे

दुबईत रविवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. बलाढ्य मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाला २० षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात फक्त ११० धावा करता आल्या. न्यूझीलंडने हे लक्ष्य २ गड्यांच्या मोबदल्यात पार केले. आणि भारताचा ८ गडी राखून पराभव केला.

वाचा- BCCIचा डाव उलटा पडला; वर्ल्डकप सुरु होण्याआधीच टीम इंडियाची पराभवाची तयारी

दरम्यान, पीटरसन अधूनमधून हिंदीमधून ट्विट करत असतो. त्याने यापूर्वीही अनेकदा हिंदीत ट्विट केले आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त पीटरसनने लिहिले होते की, भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. या वर्षी अनेक शोकांतिका घडल्या आहेत, पण आपण आणखी मजबूत होऊन परत येऊ. मला तुम्हा सर्वांची आठवण येते आणि मी लवकरच परत येण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: