श्रीगंगानगर: सध्याच्या काळात स्पर्धा खूप वाढली आहे. या वाढत्या स्पर्धेमुळं परीक्षेत अव्वल यावं म्हणून विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये कमालीचा तणाव दिसून येत आहे. मानसिक तणाव आणि परीक्षेत अपयशी ठरल्यानंतर अनेक मुले-मुली टोकाचे पाऊल उचलतात. परिणामी त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळतो. अशीच एक घटना राजस्थानच्या
श्रीगंगानगर जिल्ह्यातील रायसिंहनगर परिसरात घडली आहे. एका १५ वर्षांच्या मुलीने परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून एका कालव्यात उडी मारून जीवन संपवले.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय मुलीला परीक्षेत कमी गुण मिळाले होते. त्यामुळे ती मानसिक तणावात होती. शाळा व्यवस्थापनाकडून मुलीच्या काकांना मोबाइल क्रमांकावरून प्रगती पुस्तक पाठवले होते. त्यामुळे ती आणखीनच तणावात होती. शाळा व्यवस्थापनाकडून तिच्या काकांच्या मोबाइलवरील व्हॉट्सअॅप क्रमांकावर साधारण साडेबाराच्या सुमारास गुणपत्रक पाठवले होते. त्यानंतर दीड तासांनी मुलीने कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली, अशी माहिती समजते.
विकृतीचा कळस; ट्रेनमध्ये घुसून १७ प्रवाशांवर केले वार; अख्खा डबा दिला पेटवून
धावत्या एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक घटना; पतीसोबत प्रवास करणाऱ्या महिलेवर ओढवला भयानक प्रसंग
चिठ्ठीत लिहलं होतं, सॉरी मम्मी-पप्पा!
परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुलगी मानसिक तणावात होती. ती आपली स्कूल बॅग घराच्या जवळच सोडून गेली होती. तिच्या चपला कालव्याच्या काठावरच पडलेल्या होत्या. आत्महत्या करण्यापूर्वी मुलीने आपल्या एका वहीतील पानावर काही मजकूर लिहून ठेवला होता. त्यात तिने आपल्या पालकांकडे माफीही मागितली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी कालव्यात मृतदेहाचा शोध घेतला. तीन दिवसांनी मुलीचा मृतदेह सापडला. या घटनेची चौकशी करावी, अशी मागणी तिच्या नातेवाइकांनी केली आहे.
मुंबईत ‘सायको किलर’च्या अटकेनंतर ‘त्या’ घटनांचा पुन्हा तपास; हत्या होत्या की अपघात?
Source link
Like this:
Like Loading...