sameer wankhede : समीर वानखेडेंची दिल्लीत NCB मुख्यालयात साडेचार तास झाली कसून चौकशी


नवी दिल्लीः मुंबईतील एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे ( sameer wankhede ) यांची एनसीबीच्या दक्षता पथकाने आज ४ तासांहून अधिक काळ चौकशी केली. समीर वानखेडे यांचा जबाब आज नोंदवण्यात आल्याचे दक्षता प्रमुख म्हणाले. गेल्या आठवड्यात बुधवारी समीर वानखेडे यांची दक्षता पथकाने सुमारे ४ तास चौकशी केली होती. यानंतर दुसऱ्यांदा चौकशी करण्यात आली आहे. मुंबईत क्रूझ पार्टीवरील छाप्यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. आर्यन खानच्या सुटकेसाठी समीर वानखेडेंनी कोट्यवधींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ही चौकशी करण्यात आली.

एनसीबीच्या दक्षता पथकामध्ये ५ सदस्य आहेत. वानखेडे यांची आज दक्षता पथकाकडून जवळपास साडेचार तास चौकशी केली गेली. वानखेडे यांनी दुसऱ्यांदा आपला जबाब दक्षता पथकाकडे नोंदवला आहे. या प्रकरणी वानखेडे यांनी मुंबईतील सीआरपीएफ कॅम्पमधील ऑफीसमध्ये चौकशी झाली होती.

समीर वानखेडे हे आज सकाळीच दिल्लीत दाखल झाले होते. बनावट जात प्रमाणपत्राच्या आरोपांप्रकरणी वानखेडे हे दिल्लीत पोहोचले. त्यांनी राष्ट्रीय अनुसूचित आयोगाकडे आपली सर्व कागदपत्रे सादर केली. महाराष्ट्राचे अल्पसंख्याकमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते यांनी वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. वानखेडे यांनी नोकरीसाठी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. यानंतर वानखेडे यांनी अनुसूचित आयोगाकडे तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर आता अनुसूचित आयोगाने वानखेडे यांचा जबाब नोंदवला आहे. आता आयोगाकडून चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर निर्णय दिला जाणार आहे. अनुसूचित आयोगाकडे आपलं म्हणणं नोंदवल्यानंतर वानखेडे हे दिल्लीतील एनसीबीच्या मुख्यालयात दाखल झाले.

sameer wankhede : समीर वानखेडे पुन्हा दिल्लीत धडकले, अनुसूचित आयोगाकडे सादर केली कागदपत्रे, आयोग त

एनसीबीच्या दक्षता पथकाने खंडणीचा आरोप करणाऱ्या प्रभाकर साईललाही बोलावले होते. मात्र, प्रभाकर साईल याच्याशी अद्याप संपर्क झाला नसल्याचे दक्षता पथकाचे प्रमुख ग्यानेश्वर सिंह यांनी सांगितले. प्रभाकर या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा साक्षीदार आहे. दक्षता पथकाच्या प्रश्नांना उत्तरे दिल्यानंतर समीर वानखेडे बाहेर आले. पण बाहेर आल्यावर तिथे उपस्थित माध्यमांशी वानखेडे काहीही बोलले नाहीत.

ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश; पोलिसांनी केला १०० किलोमीटरपर्यंत आरोपींचा पाठलाग

ड्रग्स प्रकरणातील मुख्य साक्षीदार प्रभाकर साईल याने किरण गोसावी याच्यावर आर्यनच्या सुटकेसाठी ‘डील’ केल्याचा आरोप केला होता. प्रभाकर साईल हा किरण गोसावीचा बॉडीगार्ड होता. क्रूझ पार्टीच्या छाप्यावेळी गोसावी हा समीर वानखेडेंसोबत होता. त्याचे आर्यन खानसोबतचे फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. किरण गोसावीने आर्यन खानच्या सुटकेसाठी सॅम नावाच्या व्यक्तीशी २५ कोटी मागितले होते. यावेळी १८ कोटींची डील झाल्याचा दोवा, प्रभाकर साईलने केला होता. यापैकी ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असा आरोपही प्रभाकर साईलने केला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: