corona in maharashtra updates: राज्याला मोठा दिलासा! आज करोनाचे ८०९ नवे रुग्ण, मृत्यूसंख्येतही घट


हायलाइट्स:

  • गेल्या २४ तासांत राज्यात ८०९ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे.
  • गेल्या २४ तासांमध्ये एकूण १ हजार ९०१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
  • आज राज्यात एकूण १० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई: राज्याला आज करोनावर (Coronavirus) नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळाला असून आज दैनंदिन रुग्णसंख्या हजाराच्या खाली घसरली आहे. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांमध्येही वाढ झाली असून आज दैनंदिन मृत्यूसंख्या देखील कमी झाल्याने आशादायक चित्र आहे. शिवाय, राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्याही १५ हजारांवर घसरली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ८०९ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या १ हजार १७२ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण १ हजार ९०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या १ हजार ३९९ इतकी होती. तर, आजही १० रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या २० इतकी होती. (maharashtra registered 809 new cases in a day with 1901 patients recovered and 10 deaths today)

आज राज्यात झालेल्या १० रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ५२ हजार ४८६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५९ टक्के इतके आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘आमच्याही हातात दगड असू शकतात’; संजय राऊत यांचा भाजपला इशारा

मुंबईत राज्यातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण

आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजार ५५२ इतकी आहे. काल ही संख्या १६ हजार ६५८ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता मुंबई जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबईत हा आकडा ४ हजार ५०३ इतकी आहे. तर पुणे जिल्ह्यात हा आकडा ३ हजार २१० इतकी आहे. ठाणे जिल्ह्यात ही संख्या १ हजार ६१८, तर अहमदनगरमध्ये ही संख्या १ हजार ८७१ इतकी आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ४७० अशी आहे. तसेच, सांगलीत एकूण ३८९ इतकी आहे. तर, सोलापुरात ही संख्या ३१८ इतकी आहे. तर, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ५५७, रत्नागिरीत १४८ इतकी कमी झाली आहे, तर सिंधुदुर्गात ती ३२६ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘पाकिस्तानात बॉम्ब कधी फुटणार?’; मुख्यमंत्री ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार

नंदुरबार, धुळे जिल्ह्यात एक सक्रिय रुग्ण

या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४५९, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ६६ इतकी आहे. अमरावतीत ही संख्या १७ वर आली आहे. तर नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात राज्यात सर्वात कमी, म्हणजेच प्रत्येकी एक सक्रिय रुग्ण आहे.

क्लिक करा आणि वाचा- नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं दिसतंय, त्यांचा राजीनामा घ्या: दरेकर भडकले

१,६०,४३२ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ६ कोटी २७ लाख ५२ हजार ६८७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६ लाख ११ हजार ८८७ (१०.५४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६० हजार ४३२ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ९३३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: