पेन्शनधारकांसाठी खूशखबर; लाइफ सर्टिफिकेटबाबत ‘एसबीआय’ने सुरु केली ‘ही’ सुविधा


हायलाइट्स:

  • ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने (एसबीआय) व्हिडिओ लाइफ सर्टिफिकेट (व्हीएलसी) ही सुविधा सादर केली आहे.
  • या सुविधेमुळे निवृत्तीवेतनधारकांना आपल्या सोयीनुसार घरबसल्या एसबीआय कर्मचार्‍यांसह ‘व्हिडिओ कॉल’चे नियोजन करता येईल.
  • बँकेच्या शाखेत प्रत्यक्ष न जाता जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल.

मुंबई : लाखो पेन्शनधारकांना (कौटुंबिक पेन्शनधारकांव्यतिरिक्त) जीवन प्रमाणपत्र सुरळीतपणे दाखल करता यावे, या उद्देशाने देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने (एसबीआय) व्हिडिओ लाइफ सर्टिफिकेट (व्हीएलसी) ही सुविधा सादर केली आहे. याबाबतची घोषणा बॅंकेने आज केली. या सुविधेमुळे निवृत्तीवेतनधारकांना आपल्या सोयीनुसार घरबसल्या एसबीआय कर्मचार्‍यांसह ‘व्हिडिओ कॉल’चे नियोजन करता येईल आणि बँकेच्या शाखेत प्रत्यक्ष न जाता जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल.

मुहूर्ताला सोनं खरेदी! धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला सोन झालं स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव
या सुविधेकरीता पेन्शनधारकांना www.pensionseva.sbi या वेबसाईटवर ‘लॉग इन’ करावे लागेल आणि ‘व्हिडिओ एलसी’वर क्लिक करून ‘एसबीआय पेन्शन खाते क्रमांक’ टाकावा लागेल. नंतर, त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ‘ओटीपी’ त्यांना सबमिट करावा लागेल. नियम आणि अटी वाचल्यानंतर, ते ‘स्टार्ट जर्नी’ वर क्लिक करू शकतात. या प्रक्रियेत पेन्शनधारकांना आपले मूळ पॅन कार्ड तयार ठेवावे लागेल. ‘आय अॅम रेडी’वर क्लिक करून त्यांना व्हिडिओ कॉल सुरू करण्याची परवानगी द्यावी लागेल.

उत्साही सुरूवात ; सेन्सेक्स निफ्टी पुन्हा तेजीच्या वाटेवर, दोन्ही निर्देशांकांची भरपाई
या उपक्रमाचा शुभारंभ करताना, ‘एसबीआय’चे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले, “ज्येष्ठ नागरिकांच्या फायद्यासाठी आणखी एक महत्त्वाचा ग्राहक-केंद्रित उपक्रम सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्हाला विश्वास आहे, की या सुविधेमुळे निवृत्तीवेतनधारक डिजिटली सक्षम बनतील आणि कोविड-१९ साथीच्या या काळात बॅंकेच्या शाखेत जाण्याचा त्रास न होता त्यांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करता येईल.

दिवाळीची सुट्टी ; राज्यात इतके दिवस बँंका राहणार बंद, जाणून घ्या तपशील
बँकेच्या कस्टमाईज्ड तंत्रज्ञानाच्या अधिपत्याखाली उत्पादने व सेवा यांच्या माध्यमातून आमच्या सर्व ग्राहकांना आम्ही विविध प्रकारच्या सुविधा व सुखसोयी प्रदान करण्यासाठी सतत कार्य करीत असतो, असे त्यांनी सांगितले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: