हायलाइट्स:
- कचऱ्याच्या ढिगाऱ्यात महिलेचा मृतदेह
- पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली
- मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला
जुना राजवाडा पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ही महिला ४० ते ४५ वर्षाची असून तिचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. सडलेल्या मृतदेहाचा वास आल्यामुळे नागरिकांनी कोंडाळ्यात पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
सदर महिलेची अद्याप ओळख पटलेली नसून हा खून नेमका कोणी आणि कधी केला, याचा उलगडा शवविच्छेदन झाल्यानंतरच होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या घटनेनंतर देवकर पानंद परिसरातील नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या खून प्रकरणी अधिक तपास जुना राजवाडा पोलीस करत आहेत.