हायलाइट्स:
- खासदार संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल.
- हमाम में संब नंगे हैं, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये- राऊत.
- आमच्याही हातात दगड असू शकतात- राऊत यांचा भाजपला इशारा.
खासदार संजय राऊत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी राऊत यांनी कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणावरून राज्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर भाष्य करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात आज एकमेकांवर आरोप करणे सुरू आहे, एकमेकांना खोट्या आरोपात फसवणे सुरू आहे, तसेच केंद्रीय चौकशी समितीचा गैरवापर करणे सुरू आहे, असे राजकारण महाराष्ट्रात कधीही झालेले नाही, असे या पूर्वी कधीही घडलेले नाही, असे राऊत म्हणाले. महाराष्ट्रात हे राजकारण दोन वर्षात सुरू झाले आहे, मात्र हे महाराष्ट्राचे राजकारण नाही, असे राऊत म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- ‘पाकिस्तानात बॉम्ब कधी फुटणार?’; मुख्यमंत्री ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार
भाजपवर टीका करताना राऊत पुढे म्हणाले की, राजकारण म्हटले की हमाम में सब नंगे होते है. मलिक यांनी काही पुरावे दिले आहेत. ज्यांचे घर काचेचे आहे अशा लोकांनी इतरांवर मुळीच दगडफेक करू नये, कारण आमच्याही हातात एक दगड असू शकतो. मात्र, आम्ही तुमच्या इतके खालच्या पातळीवर येणार नाही आणि आम्ही कमरेखाली वार कधीही केला नाही. कारण आम्ही पवारांचे संस्कार असलेले राजकारण केले आहे.
क्लिक करा आणि वाचा- नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं दिसतंय, त्यांचा राजीनामा घ्या: दरेकर भडकले
‘फडणवीसांनी खुलासा करावा’
महाराष्ट्रात ज्या पद्धतीचे राजकारण सुरू करण्यात आले आहे, त्यात आता यात शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यालाही घुसडवण्यात आलेले आहे. भाजपच्या नेत्यांना याची लाज वाटली पाहिजे, अशी टीका करतानाच आपल्या राजकारणासाठी शरद पवार यांच्या सारख्या मोठ्या नेत्यांवर टीका केली जात असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. भाजपने शरद पवार यांवर घाणेरड्या पद्धतीने टीका केली आहे. मात्र ही टीका हे भाजपचे अधिकृत मत असल्यास त्यांनी तसा खुलासा केला पाहिजे, असे राऊत म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- ‘आम्हांला रोज बेइज्जत केले जात आहे’; वानखेडेंची अरुण हलदर यांच्याकडे तक्रार