‘चाट पे चर्चा’ : अखिलेश यांच्यासोबतचं विमान सोडून प्रियांकांसोबत RLD नेते चौधरी दिल्लीत


नवी दिल्ली : रविवारी सायंकाळी काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी आणि राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख जयंत चौधरी लखनऊहून एकाच चार्टर्ड विमानात गप्पा मारत दिल्लीत दाखल झाले. इतकंच नाही तर प्रियांकांसोबत चार्टर्ड विमानातून येण्यासाठी जयंत यांना आपलं अगोदरच निश्चित करण्यात आलेलं विमानही सोडावं लागलं. विशेष म्हणजे, जयंत ज्या विमानातून दिल्लीला परतणार होते त्याच विमानात अखिलेश यादव हेदेखील प्रवास करत होते. मग काय राजकीय वर्तुळात हाच सध्या चर्चेचा विषय ठरलाय.

काँग्रेस – आरएलडीची हातमिळवणी?

यानंतर जयंत-प्रियांका यांच्या भेटीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकदलाच्या (आरएलडी) हातमिळवणीची चर्चा सुरू झालीय. मात्र, सध्या अखिलेश यादव समाजवादी पक्षासोबत हातमिळवणीची चर्चा सुरू असताना काँग्रेससोबत युतीची शक्यता राष्ट्रीय लोकदलाच्या नेत्यांनी फेटाळून लावलीय. मात्र, या दोन्ही नेत्यांची पुन्हा एकदा भेट होण्याची शक्यता त्यांनी फेटाळली नाही.

प्रियांका – जयंत चौधरी यांची अचानक भेट

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ विमानतळावर काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी आणि राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख जयंत चौधरी अचानक एकमेकांसमोर आले. यावेळी, प्रियांका गांधी यांच्यासोबत पक्षाचे नेते दीपेंद्र हुड्डा आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हेदेखील उपस्थिती होते.

रविवारी प्रियांका गांधी गोरखपूरमध्ये होत्या तर चौधरी यांनी लखनऊमध्ये आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. विमानतळावर भेट झाल्यानंतर प्रियांका गांधी आणि जयंत चौधरी यांच्यात दीर्घ चर्चाही झाल्याचं समजतंय. काँग्रेस नेत्यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही नेत्यांत ‘राजकीय चर्चा’ही झाली.

akhilesh yadav news: अखिलेश यादव यांची मोठी घोषणा, ‘आगामी यूपी विधानसभा निवडणूक लढवणार नाही’
‘जिनांची तुलना सरदार पटेलांशी करता, अखिलेश यादव तालिबानी मानसिकतेचे’
UP Elections: …तर तालिबानविरुद्ध एअरस्ट्राईक निश्चित, योगींनी भरला दम
चाट पे चर्चा

प्रियांका गांधी, भूपेश बघेल, दीपेंद्र हुड्डा आणि जयंत चौधरी यांच्या गप्पा सुरू असतानाच लखनऊच्या एका प्रसिद्ध दुकानातून चाट मागवण्यात आलं होतं. चाटच्या डिलिव्हरीसाठी वेळ लागत होता. या दरम्यान जयंत चौधरी यांचं विमान निघणार होतं. यावर, भूपेश बघेल यांच्यासहीत इतर काँग्रेस नेत्यांकडून जयंत चौधरी यांना आपल्यासोबत चार्टर्ड विमानानं येण्याची विनंती करण्यात आली. याला चौधरी यांनीही होकार दिला.

चार्टर्ड विमानानं प्रवास

जयंत यांनी ज्या निश्चित विमानाचा प्रवास टाळला त्याच विमानातून अखिलेश यादव यादव हेदेखील प्रवास करत होते. राष्ट्रीय लोकदलाच्या एका नेत्याच्या म्हणण्यानुसार, अखिलेश यादव हे जयंत चौधरी यांचं तिकीट निश्चित असलेल्या विमानातून प्रवास करत आहेत, याची माहिती पक्षाला नव्हती.

आरएलडी आणि समाजवादी पक्षाचे संबंध ताणलेले?

दरम्यान, राष्ट्रीय लोकदल आणि समाजवादी पक्षातही सगळं काही सुरळीत नसल्याचं समोर येतंय. काँग्रेस सोडून समाजवादी पक्षात सहभागी झालेले नेते हरेंद्र मलिक आणि त्यांचा मुलगा पंकज मलिक यांना अखिलेश यादव यांनी मजफ्फरपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्याचं आश्वासन दिलंय. यामुळे जयंत चौधरी नाराज आहेत. तसंच दोन्ही पक्षांत अद्याप जागावाटपावरही एकमत झालेलं नाही. त्यामुळे अखिलेश यादव यांच्यासोबत चर्चा फिस्कटली तर उत्तर प्रदेशात नवं राजकीय समीकरण पाहायला मिळू शकतं.

Uttar Pradesh: देशातील ४६ रेल्वे स्टेशन्स बॉम्बस्फोटात उडवण्याची धमकी, अलर्ट जारी
Munawar Faruqui: तीनदा सीम बदललं, धमक्या रोजच्याच : कॉमेडीयन मुनव्वर फारुकीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: