बऱ्याच दिवसांनी समोर आलेल्या अनिल देशमुख यांनी सर्वप्रथम केली ‘ही’ चौकशी


हायलाइट्स:

  • माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर समोर आले
  • चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात लावली हजेरी
  • व्हिडिओ ट्वीट करून मांडली स्वत:ची बाजू

मुंबई: सक्तवसुली संचालनालयाचा (ED) ससेमिरा सुरू झाल्यापासून गायब झालेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आज अचानक समोर आले. त्यांनी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजेरीही लावली. समोर येताच एक व्हिडिओ ट्वीट करून त्यांनी अनिल देशमुख यांनी आपली बाजू मांडली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी १०० कोटींच्या खंडणीचे आरोप केल्यानंतर अनिल देशमुख खऱ्या अर्थानं अडचणीत आले होते. परमबीर यांच्या आरोपांनंतर राजकीय विरोधकांनी राज्य सरकारला घेरले. त्यामुळं देशमुख यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. नंतर सीबीआय व ईडीनं देशमुख यांची चौकशी सुरू केली. त्यांच्यावर मनी लॉण्ड्रिंगचेही आरोप झाले. त्यांच्या घरी व कार्यालयात ईडीनं धाडी टाकल्या. प्रकृतीच्या कारणास्तव ईडीच्या चौकशीला हजर न राहणारे देशमुख कालांतरानं ‘नॉट रिचेबल’ झाले. आज बऱ्याच दिवसांनंतर ते समोर आले आहेत. समोर येताच त्यांनी सर्वात आधी परमबीर सिंग यांच्या ठावठिकाण्याची चौकशी केली. ‘माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंग कुठे आहेत?,’ असा प्रश्न त्यांनी केला. ‘मीडियातील बातम्यांनुसार, परमबीर सिंग विदेशात पळून गेलेत. आरोप करणारेच पळून गेलेत. त्यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत. आज त्यांच्याच विरोधात पोलीस खात्यातील लोकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत,’ याकडंही देशमुख यांनी लक्ष वेधलं.
वाचा: सचिन वाझेचा ताबा मुंबई पोलिसांकडे; चौकशीतून मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता

‘ईडीच्या चौकशीला मी सुरुवातीपासून सहकार्य केलं आहे. ज्या-ज्या वेळी मला समन्स आलं, त्यावेळी मी ईडीला उत्तर पाठवलं होतं. माझी याचिका उच्च न्यायालयात आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायलयातही मी याचिका दाखल केली आहे. त्याचा निकाल आल्यानंतर मी स्वत: ईडीच्या कार्यालयात येईन, असं मी ईडीला कळवलं होतं. ज्या ज्या वेळी ईडीनं माझ्या घरांवर छापे टाकले, त्यावेळी माझ्या कुटुंबीयांनी, कर्मचाऱ्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केलं. मी स्वत: सीबीआयच्या कार्यालयात दोनदा हजर राहून माझं म्हणणं मांडलं. अजूनही माझी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. पण आज मी स्वत: ईडीच्या कार्यालयात हजर राहिलोय,’ असं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं.

वाचा: फडणवीसांचं आव्हान नवाब मलिक यांनी स्वीकारलं; ट्वीट करून म्हणाले…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: