हायलाइट्स:
- पंजाब नॅशनल बँक (PNB) ने नुकतीच पीएनबी सेवा योजनेबद्दल माहिती दिली आहे.
- त्याचा खूप फायदा लहान व्यावसायिकांना व्यवसाय वाढविण्यासाठी होऊ शकतो.
- जाणून घेऊया एमएसएमईसाठी कर्ज योजनेच्या अधिक तपशील.
उत्साही सुरूवात ; सेन्सेक्स निफ्टी पुन्हा तेजीच्या वाटेवर, दोन्ही निर्देशांकांची भरपाई
या योजने अंतर्गत व्यवसायासाठी खेळते भांडवल आणि मुदत कर्ज घेता येते. पीएनबीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. एमएसएमईसाठी कर्ज योजनेच्या अधिक तपशीलांसाठी तुम्ही पीएनबीच्या अधिकृत संकेतस्थळावर pnbindia.in लॉग इन करू शकता. नागरिकांना पीएनबी सेवा योजनेची माहिती असायला हवी.
दिवाळीपूर्वी बंपर कमाईची संधी; गुंतवणुकीसाठी आज खुले झाले या चार कंपन्यांचे IPO
व्यवसाय वाढविण्यात मदत करेल पीएनबी
पीएनबीने नुकतेच आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे. या पोस्टमध्ये बँकेने सांगितले आहे की, आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या. आम्ही तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढविण्यात मदत करू. अधिक माहितीसाठी tinyurl.com/jsf2njj7 वर क्लिक करा.
या योजनेची प्रामुख्याने दोन उद्दिष्टे आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत –
१. खेळते भांडवल (वर्किंग कॅपिटल) – खेळत्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी कर्ज घेतले जाऊ शकते.
२. मुदत कर्ज – जमीन, कार्यालयाची इमारत, उपकरणे आणि पायाभूत सुविधा (नवीन उपक्रमांद्वारे) सारख्या स्थावर मालमत्तेसाठी मुदत कर्ज घेतले जाऊ शकते.
दिवाळीची सुट्टी ; राज्यात इतके दिवस बँंका राहणार बंद, जाणून घ्या तपशील
कोण करू शकतो अर्ज?
पीएनबी सेवा योजनेसाठी पात्रतेमध्ये वैयक्तिक/ भागीदारी/ मर्यादित दायित्व भागीदारी (LLP)/ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी/ पब्लिक लिमिटेड कंपनी/ ट्रस्ट/ सोसायटी आणि सहकारी संस्था (लागू कायद्यानुसार नोंदणीकृत आणि अंतर्भूत) यांचा समावेश होतो. तसेच जीएसटी नोंदणीकृत क्रमांक (जेथे लागू असेल) आणि उद्योग आधार क्रमांक असलेले एमएसएमई उपक्रम या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
कर्ज सुविधा :
– खेळते भांडवल (सीसी/ओडी लागू असेल)
– सामान्य व्यवसायाच्या उद्देशासाठी स्थिर मालमत्ता/ उपकरणे मिळविण्यासाठी मुदत कर्ज
– नॉन-फंड आधारित मर्यादा
मुदत कर्जाच्या परतफेडीचा कालावधी कमाल सात वर्षांचा असेल, पण ऑफरच्या गुणवत्तेच्या आधारावर पुढील उच्च अधिकाऱ्याद्वारे परतफेड वाढवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. खेळत्या भांडवलाच्या मर्यादेच्या बाबतीत मंजुरीची वैधता एक वर्ष असेल.
व्याजदर एमएसएमई कर्जासाठी उपलब्ध आरओआयनुसार असेल. अधिक तपशीलांसाठी तुम्ही पीएनबी (PNB) च्या अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर लॉग इन करू शकता.