इंधन महागाईचा धडाका सुरूच ;जाणून घ्या आज कितीने महागले पेट्रोल-डिझेल


हायलाइट्स:

  • देशभरात आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी ३५ पैशांनी महागले.
  • जागतिक कमॉडिटी बाजारात क्रूडचा भाव वाढल्याने कंपन्यांसाठी इंधन आयात खर्चिक बनली आहे.
  • मागील सहा दिवसात पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी २.१० रुपयांनी महागले आहे.

मुंबई : देशभरात आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी ३५ पैशांनी महागले. जागतिक कमॉडिटी बाजारात क्रूडचा भाव वाढल्याने कंपन्यांसाठी इंधन आयात खर्चिक बनली आहे. त्याचा भार सामान्य ग्राहकांवर टाकला जात आहे. आज सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली आहे. मागील सहा दिवसात पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी २.१० रुपयांनी महागले आहे.

१ नोव्हेंबरपासून होणार महत्त्वाचे ५ बदल; तुमच्या आयुष्यावर होणार थेट परिणाम
आजच्या दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ११५.५० रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोल १०९.६९ रुपये इतके वाढले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०६.३५ रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ११०.१५ रुपये इतके वाढले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११८.४६ रुपये असून बंगळुरात पेट्रोल ११३.५६ रुपये झाले आहे.

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दणका;सिलिंडर दरवाढीचा उडाला भडका, चेन्नईत भाव २१३३ रुपयांवर
मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव १०६.६२ रुपये इतका वाढला आहे. दिल्लीत डिझेल ९८.४२ रुपये इतके वाढले आहे. चेन्नईत १०२.५९ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव १०१.५६ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव १०७.९० रुपये असून बंगळुरात डिझेल १०४.५० रुपये आहे.

दिवाळीची सुट्टी ; राज्यात इतके दिवस बँंका राहणार बंद, जाणून घ्या तपशील
अमेरिकेच्या ऊर्जा विभाग प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, २२ ऑक्टोबर २०२१ ला संपलेल्या आठवड्यात अमेरिकेच्या तेलसाठ्यात ४.३ दशलक्ष बॅरल्सची वाढ करण्यात आली आहे. ती बाजाराच्या १.९ दशलक्ष बॅरल्सची वाढ होण्याच्या अंदाजापेक्षा कितीतरी जास्त ठरली. तथापि, जागतिक मागणीत वाढ होत असताना पुरवठा घटण्याच्या संभाव्य चिंतामुळे तेलाच्या साप्ताहिक किंमतींत वाढ झाली. यामुळे बाजाराच्या धारणेला आणखीच बळ मिळाले. तेलाची जागतिक बाजारपेठ तणावात असतानाही ओपेक आणि त्यांच्या सहकारी संस्था तेल उत्पादनात वाढ करण्याच्या आपल्या पूर्वनिर्धारित निर्णयावर ठाम आहेत. यामुळे तेलाच्या किमतींना आणखीच मदत मिळाली आहे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: