Munawar Faruqui: तीनदा सीम बदललं, धमक्या रोजच्याच : कॉमेडीयन मुनव्वर फारुकी


हायलाइट्स:

  • स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचे तीन कार्यक्रम रद्द
  • बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या
  • हिंदुत्ववाद्यांकडून कार्यक्रम स्थळी जाळपोळीची धमकी

नवी दिल्ली : चर्चित स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी याचे देशातील आर्थिक राजधानी मुंबईतील तीन कार्यक्रम नुकतेच रद्द करण्यात आले. यानंतर मीडियाशी बोलताना मुनव्वरनं या घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. कुणाला मत द्यायचं याचा निर्णय देशातील तरुणांना घेता येत असेल तर त्यांना काय पाहायचंय याचाही निर्णय ते नक्कीच घेऊ शकतात, असं मुनव्वर फारुकी यानं म्हटलंय. तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही आपल्याला दररोज जवळपास ५० धमक्यांचे कॉल येतात, असंही मुनव्वरनं म्हटलंय.

मला आतापर्यंत तीन वेळा सिम कार्ड बदलावं लागलंय. जेव्हा जेव्हा माझा नंबर लीक होतो, तेव्हा लोक मला फोन करून धमक्या देतात, शिवीगाळ करतात, असंही त्यानं म्हटलंय.

२९, ३०, ३१ ऑक्टोबर रोजी फारुकीचे कार्यक्रम मुंबईतील बोरीवली आणि बांद्रा भागात आयोजित करण्यात आले होते. परंतु, गुजरातहून काही हिंदुत्ववादी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत दाखल होत फारुकीच्या कार्यक्रमाविरुद्ध आंदोलन केलं. कार्यक्रम झाले तर कायदे-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी धमकीच ‘बजरंग दला’च्या कार्यकर्त्यांकडून अप्रत्यक्षरित्या दिली गेली. कार्यक्रम स्थळ पेटवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर आयोजकांकडून फारुकीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले.


UP Elections: …तर तालिबानविरुद्ध एअरस्ट्राईक निश्चित, योगींनी भरला दम
melt temple gold into bars : मंदिरांचे २००० किलोहून अधिक सोने वितळवण्यात येणार होते! हायकोर्टने टोचले कान…

तुरुंगातून जामीन मिळाल्यानंतर मी आतापर्यंत जवळपास ५० कार्यक्रम केले आहेत. त्यातील जवळपास ९० टक्के कार्यक्रमात मला ‘स्टँडिंग ओवेशन’ मिळालं. कोण कुठल्या धर्माचं किंवा जातीचं आहे हे प्रेक्षकांसाठी महत्त्वाचं नाही. माझ्या कार्यक्रमात कोणत्याही धर्मावर कोणत्याही प्रकारची टिप्पणी केली जात नाही, असंही फारुकीनं यावेळी स्पष्ट केलं.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून ‘हिंदू देवी-देवतांचा अपमान’ केल्याच्या आरोपानंतर यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला जवळपास महिनाभर फारुकीला तुरुंगात राहावं लागलं होतं. सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतर तो तुरुंगाबाहेर पडू शकला. मात्र, यानंतर त्याला काम मिळणंही कठिण होऊन बसलंय. दोन तासांच्या कार्यक्रमातून १० सेकंदाची क्लीप काढून बजरंग दलाचे कार्यकर्ते आपल्याला निशाणा बनवत असल्याचं फारुकीनं म्हटलंय.

एका कार्यक्रमातून चालक, क्रू मेम्बर आणि गार्ड अशा जवळपास ८० जणांना रोजगार मिळू शकतो. कार्यक्रम रद्द झाल्यामुळे आपल्यासोबत त्यांनाही फटका बसत असल्याचं सांगत फारुकीनं आपली खंत व्यक्त केलीय. सोबतच, ‘जागा पेटवून देऊ, तोडफोड करू तर हे एका स्वतंत्र देशात चुकीचं कृत्य आहे’ असं सांगताना ‘आपल्या कार्यक्रमात कोणतंही चुकीचं कृत्य केलं जात नाही, त्यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही’ असं आवाहनही फारुकीनं आयोजकांना केलंय.

Covid 19: देशभरात दिवाळीच्या सणानं आणलं नवं चैतन्य! पण आरोग्याची काळजी घ्या…
love marriage with dalit youth : दलिताशी लग्न केल्याने तरुणीचे शुद्धीकरण! केस कापले, नदीत स्नान करायला लावले





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: