दिवाळीची सुट्टी ; राज्यात इतके दिवस बँंका राहणार बंद, जाणून घ्या तपशील


हायलाइट्स:

  • एक तारखेपासूनच अनेक महत्वाचे बदल होत आहेत.
  • त्यामुळे पूर्ण महिन्यात तुमचे काम मार्गी लावण्यासाठी आधीच नियोजन करून ठेवा.
  • कोणत्या दिवशी तुम्ही बँकेत जाऊन तुमचे काम पूर्ण करू शकाल, हे जाणून घ्या.

मुंबई : आजपासून नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. एक तारखेपासूनच अनेक महत्वाचे बदल होत आहेत. त्यामुळे पूर्ण महिन्यात तुमचे काम मार्गी लावण्यासाठी आधीच नियोजन करून ठेवा. या महिन्यातच दिवाळी, भाऊबीज असे अनेक सण येतात. त्यामुळे काही दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेला सुट्टी कधी आहे आणि कोणत्या दिवशी तुम्ही बँकेत जाऊन तुमचे काम पूर्ण करू शकाल, हे जाणून घ्या.

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दणका;सिलिंडर दरवाढीचा उडाला भडका, चेन्नईत भाव २१३३ रुपयांवर
जर तुम्ही बँकेत जाण्याचा विचार करत असाल, तर अगोदर ही यादी तपासा, यामुळे तुम्हाला बँकेच्या सुट्टीबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. आणि महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यांतील बँकांना कधी सुट्ट्या आहेत, तेदेखील पाहू शकता.

सण-उत्सवामुळे महाराष्ट्रातील बँकांना ३ दिवस सुट्ट्या
४ नोव्हेंबर – दिवाळी अमावस्या / काली पूजा (बंगळुरू वगळता सर्व शहरांतील बँका बंद राहतील)
५ नोव्हेंबर – दिवाळी / नवीन वर्ष / गोवर्धन पूजा (अहमदाबाद, बेलापूर, बंगलोर, डेहराडून, गंगटोक, जयपूर, कानपूर, लखनऊ, मुंबई आणि नागपूर येथे बँका बंद राहतील)
१९ नोव्हेंबर – गुरु नानक जयंती/कार्तिक पौर्णिमा (ऐजाँल, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, दिल्ली, रायपूर, रांची, शिमला आणि श्रीनगर येथील बँका बंद राहतील. )

शेअर बाजार ; दोन सत्रात झालीय मोठी पडझड , या गोष्टी ठरवणार पुढची दिशा
देशभरातील इतर राज्यांमध्ये बँकांना सुट्टी –
१ नोव्हेंबर म्हणजेच आज – कन्नड राज्योत्सव आणि कुट (बंगळुरू आणि इंफाळमध्ये बँका बंद)
३ नोव्हेंबर – नरका चतुर्दशी (बेंगळुरू बँक बंद राहील)
६ नोव्हेंबर – भाऊबीज/चित्रगुप्त जयंती/लक्ष्मीपूजा/दिवाळी (गंगटोक, इंफाळ, कानपूर, लखनऊ आणि शिमला येथे बँका बंद राहतील)
१० नोव्हेंबर – छठ पूजा/सूर्यषष्ठी/दला छठ (पाटणा आणि रांची मध्ये बँका बंद राहतील)
११ नोव्हेंबर – छठ पूजा (पाटणा बँकांमध्ये काम बंद राहील)
१२ नोव्हेंबर – वांगला महोत्सव (शिलॉंगमधील बँका बंद राहतील)
२२ नोव्हेंबर – कनकदास जयंती (बेंगळुरू बँक बंद राहील)
२३ नोव्हेंबर – सेंग कुत्स्नाम (शिलॉंगच्या बँका बंद राहतील)

दिवाळीत मुलीला द्या खास गिफ्ट; ‘या’ योजनेत गुंतवणूक करून तिचं भविष्य करा सुरक्षित
शनिवारी आणि रविवारी सुट्ट्या
या सणांव्यतिरिक्त दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीही बँकांना सुट्टी असेल. रविवारीही बँकांमधील कामकाज बंद राहणार आहे.

१३ नोव्हेंबर- महिन्याचा दुसरा शनिवार
२७ नोव्हेंबर – महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँकेतील कामकाज बंद राहणार आहे.

रविवार – ७, १४, २१, २८ नोव्हेंबरला रविवार येत आहे, त्यामुळे बँकांना सुट्टी असेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: