हायलाइट्स:
- दोन वयोवृद्ध महिलांचा निर्घृण खून
- घटनेनं शहरात खळबळ
- पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
माजी नगरसेवक राजू मसुरकर यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, या परिसरात वास्तव्यास असणाऱ्या निलीमा खानविलकर या माझ्या जवळच्या नातेवाईक आहेत. मी त्यांची विचारपूस करत आज सकाळी नेहमीप्रमाणे त्यांना घरी टीव्ही लावून देण्यासाठी आलो असता हाक मारल्यानंतर त्यांनी आवाज दिला नाही. त्यामुळे मी थेट घरात गेलो तेव्हा त्या दोघी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. हा सर्व प्रकार पाहून मी याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याला फोन करून दिली.
हा प्रकार अज्ञात चोरट्यांकडून झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण खून झालेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत.
दरम्यान, या घटनेची नोंद पोलीस स्थानकात झाली असून पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.