आसिफ अलीवर भडकले अफगाणिस्तानचे राजदूत; गनशॉट अॅक्शनवर सुनावलं


दुबई : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघाने शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) अफगाणिस्तानविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवला. आणि मानहानीकारक पराभवापासून वाचला. अफगाणिस्तान संघाने जवळजवळ त्यांना पराभूत केले होतेच, पण आसिफ अलीने निर्णायक वेळी तुफानी फटकेबाजी करत एकाच षटकात चार षटकार लगावले आणि सामन्याचा निर्णय बदलून टाकला. तेव्हापासून आसिफ चर्चेत आहे. सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. अनेक क्रिकेट पंडित आसिफचे गोडवे गात आहेत, पण याचदरम्यान एका व्यक्तीने आसिफवर जोरदार टीका केली आहे. ही व्यक्ती आहे अफगाणिस्तानचे श्रीलंकेतील राजदूत एम. अश्रफ हैदरी.

वाचा- भारतीय संघाला मिळाली गुड न्यूज; न्यूझीलंडविरुद्धच्या विजयासाठी…

आसिफने सामना जिंकल्यानंतर शेवटी आपली बॅट बंदुकीसारखी हातात धरली. हीच गोष्ट हैदरी यांना आवडली नाही आणि त्यांनी शनिवारी ट्विटरवरून आसिफवर टीका केली. त्यांनी लिहिले की, “पाकिस्तानच्या मुख्य खेळाडूने अफगाणिस्तानच्या खेळाडूंना बंदूक दाखवणे हे आक्रमकतेचे लज्जास्पद कृत्य आहे. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी त्याला आणि त्याच्या संघाला कडवे आव्हान दिले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, खेळ ही निरोगी स्पर्धा, मैत्री आणि शांतता यासाठी आहे.

वाचा- जे गेल्या १८ वर्षात झाले नाही ते टीम इंडियाला आज करावे लागले

धोनीशी केली तुलना
हैदरी यांनी ट्विट करण्यापूर्वी आसिफचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत होता. आसिफ अलीची ही गनशॉट अॅक्शन पाहून अनेकांना महेंद्रसिंह धोनीची आठवण झाली. २००५ मध्ये जयपूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावून धोनीने त्याच पद्धतीने शतक साजरे केले होते. अनेक ट्विटर युजर्सनी धोनी आणि आसिफचे एकत्र फोटो ट्विट केले आहेत.

वाचा- IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध विजयासाठी भारतीय संघात होणार ३ बदल; पाहा अशी असेल टीम इंडिया

अफगाणिस्तानच्या राजदूतांशिवाय इतरही काही लोकांनी आसिफवर टीका केली, तर काहींनी त्याचे समर्थन केले. पाकिस्तानातील डॉन वृत्तपत्राचे क्रीडा पत्रकार अब्दुल गफ्फार यांनी हैदरी यांना उत्तर देताना लिहिले की, धोनीनेही श्रीलंकेविरुद्ध शतक साजरे करताना अशी अॅक्शन केली होती, पण श्रीलंकेकडे संवेदनशीलता होती आणि ते चांगल्या भावनेने क्रिकेट खेळत होते. खेळ आणि राजकारण यांची सांगड घालू नका.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: