कोल्हापूर : ६ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला; अत्याचार झाल्याचा संशय


हायलाइट्स:

  • स्मशानभूमीत सहा वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला
  • संशयित तरुणास वडगाव पोलिसांनी अटक केली
  • परिसरात मोठा पोलीस फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील खोची या गावातील नवीन मशिदीजवळील स्मशानभूमीत सहा वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. मुलीवर अत्याचार करून तिला ठार केले असल्याचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी एका संशयित तरुणास वडगाव पोलिसांनी अटक केली आहे. मुलीचा निर्जनस्थळी झाडीत मृतदेह आढळल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, तिरूपती काकडे, पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैंजणे, पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. या परिसरात गर्दी जमल्याने मोठा पोलीस फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता. तसंच संशयिताच्या घराजवळ पोलिसांनी कडक पहारा ठेवला आहे.

मॅनेजरच्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याची आत्महत्या; आरोपीचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला!

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सहा वर्षीय मुलगी दुपारी बारापासून घरातून गायब झाली होती. आई शेतात कामाला गेली असल्यामुळे दुपारी आई घरी आल्यानंतर मुलीची शोधाशोध सुरू झाली. गल्लीतील युवकांनी व काही महिलांनी परिसरामध्ये, नदीकाठी, शेतात तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दुपारी चार वाजता येथील गावच्या पश्चिमेला असणाऱ्या जुन्या स्मशानभूमीजवळ तिचा मृतदेह काही तरुणांना आढळून आला. त्यांनी तात्काळ वडगाव पोलिसांनी घटनेची माहिती कळवली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली व परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी घटनास्थळी मोठा जमाव जमा झाला होता. पोलिसांनी जमावाला सांगून घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह सावर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आला.

दरम्यान, पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू केली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: