दुचाकी चोरी करणं पडलं महागात; आरोपीला न्यायालयाने ठोठावला ‘इतक्या’ महिन्यांचा कारावास


हायलाइट्स:

  • दुचाकीची चोरी करणाऱ्या आरोपीला दणका
  • चार महिन्‍यांचा कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा
  • औरंगाबाद शहरातील घटना

औरंगाबाद : दुकानासमोर उभी असलेली दुचाकी चोरणारा आरोपी शेख जाहेद शेख गुणी याला चार महिन्‍यांचा कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए. एस. वानखेडे यांनी ठोठावली.

देविदास एकनाथ पवार (४९, रा. धनगल्ली, हर्सूल) यांनी २ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी साडेचार वाजेच्‍या सुमारास सेंट्रल नाका येथे मित्राच्‍या दुकानासमोर हॅन्डल लॉक करुन दुचाकी उभी केली होती. दरम्यान, या दुचाकीची चोरी झाली. संबंधित दुचाकी फायनान्‍स कंपनीने जप्‍त केल्याचा संशय आल्याने त्‍यांनी दुसऱ्या दिवशी फायनान्‍स कंपनीकडे चौकशी केली असता, दुचाकी जप्‍त झाली नसून तिची चोरी झाल्याचे स्पष्ट झालं. त्यानंतर जिन्‍सी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता.

कोल्हापूर : ६ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला; अत्याचार झाल्याचा संशय

गुन्‍ह्यात दोषारोपपत्र दाखल होऊन प्रकरणाच्‍या सुनावणीवेळी आरोपी शेख जाहेद शेख गुणी (२५, रा. हुसेन कॉलनी, गारखेडा) याने गुन्‍ह्याची कबुली दिली.

दरम्यान, न्‍यायालयाने आरोपीला दोषी ठरवून आरोपीला भादंवी कलम ३७९ अन्‍वये चार महिने कारावास व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास दहा दिवसांच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सहायक सरकारी वकील समीर बदरे यांनी काम पाहिले, तर पैरवी म्हणून जमादार प्रकाश पाईकराव यांनी काम पाहिले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: