covid vaccination : लसीकरणात ४० जिल्हे मागे, महाराष्ट्रातीलही; PM मोदी घेणार मुख्यमंत्र्यांसोबत बैठक


नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रुप-20 आणि कॉन्फरन्स ऑफ पार्टीजमधील (COP-26) जागतिक नेत्यांसोबतच्या बैठकीत उपस्थित राहून मायदेशी परतणार आहेत. मायदेशी परतताच करोनाविरोधी लसीकरणात मोहीमेत मागे ( pm modi to hold meeting on covid vaccination ) पडलेल्या विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यासाठी बैठक घेणार आहेत. येत्या ३ नोव्हेंबरला ही बैठक होणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) रविवारी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. या बैठकीला संबंधित राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी होणार आहेत.

‘जी 20 आणि सीओपी -26 शिखर परिषदांमध्ये सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी लगेचच मायदेशी परतणार आहेत. मायदेशी परतात पंतप्रधान मोदी हे ३ नोव्हेंबरला लसीकरणा कमी टक्केवारी असललेल्या जिल्ह्याधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत आढावा घेतील’, असं पीएमओकडून सांगण्यात आलं आहे.

करोनावरील लसीच्या पहिल्या डोसची टक्केवारी ही ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. दुसऱ्या डोसची टक्केवारीही खूपच कमी आहे, अशा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी या बैठकीत उपस्थित असतील, असं PMO ने सांगितले. पंतप्रधान झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मेघालयासह लसीकरणाचा दर कमी असलेल्या इतर काही राज्यांतील एकूण ४० जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान मोदी संवाद साधतील, अशी माहिती पीएमओने दिलीय.

supreme court : ‘नागरिकांच्या जीवाशी खेळणार नाही… कोवॅक्सिन घेतलेल्यांना कोविशिल्ड देण्याचे निर्देश कसे देणार?’

सरदार वल्लभभाई पटेल जयंती; PM मोदी, शहांनी वाहिली आदरांजली, शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल

G-20 आणि COP-26 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान गुरुवारी रात्री इटली आणि ब्रिटनला रवाना झाले. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या निमंत्रणावरून ते १ ते २ नोव्हेंबरला ब्रिटनमधील ग्लासगो येथे जातील. तिथे पंतप्रधान मोदी हे २६ व्या COP-26 मध्ये जागतिक नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील. यानंतर ३ नोव्हेंबरला ते मायदेशी परततील.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: