IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघात दोन मोठे बदल, पाहा कोणाला मिळाली संधी…


दुबई : न्यूझीलंडविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात भारतीय संघात दोन मोठे बदल करण्यात आले. न्यूझीलंडने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर विराट कोहलीने संघातील दोन मोठे कोणते करण्यात आले, याबद्दल सांगितले.

भारतीय संघात यावेळी इशान किशनला संधी देण्यात आली आहे, सूर्यकुमार यादवच्या पाठीत दुखत असल्यामुळे तो या सामन्यात खेळणार नाही. त्याचबरोबर या महत्वाच्या सामन्यासाठी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. भुवनेश्वर कुमारला या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.
रोहितने ११२ सामन्यातील १०४ डावात २ हजार ८६४ धावा तर राहुलने ५० सामन्यातील ४६ डावात १ हजार ५६० धावा केल्या आहेत. मधळ्याफळीत रोहित शर्मा, इशान किशन आणि ऋषभ पंत यांच्यावर जबाबदारी असेल. गेल्या सामन्यात विराटने भारताचा डाव सावरला होता. या सामन्यात सूर्यकुमारच्या जागी इशान किशनला संधी दिली जाऊ शकते, असे म्हटले जात होते. कदाचित हार्दिक पंड्यालाही संघातून डच्चू मिळू शकतो, असे म्हटले जात होते. कारण गेल्या काही दिवसांपासून हार्दिकच्या फिटनेसच्या बऱ्याच समस्या पुढे आल्या आहेत. त्याचबरोबर हार्दिक आता संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण दुखापतीमुळे हार्दिकला आता गोलंदाजी करणे शक्य नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे एक फलंदाज म्हणूनच हार्दिक भारतीय संघात खेळणार आहे. पण एक फलंदाज म्हणून हार्दिकला आतापर्यंत चांगली कामगिरी करता आलेली नाही. पण हार्दिककडे सूर्यकुमारपेक्षा आंतरराष्ट्रीय सामन्यांचा जास्त अनुभव जास्त आहे आणि हीच गोष्ट फक्त त्याच्या पथ्यावर पडू शकते. त्यामुळे इशानला संघात स्थान द्यायचे असेल तर कोणाला विश्रांती द्यायची, हा निर्णय आता भारतीय संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागणार आहे.

भारतीय संघात आर. अश्विन आणि शार्दुल ठाकूर या दोन खेळाडूंचे पुनरागमन होऊ शकते, असे सामन्यापूर्वी म्हटले जात होते. कारण अश्विन आणि जडेजा यांची जोडी चांगलीच कामगिरी करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे भारताला जर विजय मिळवायचा असेल तर त्यासाठी अश्विन आणि जडेजा यांनी एकत्र खेळणे महत्वाचे होते. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमार हा चांगल्या फॉर्मात नसल्याचे पाहायला मिळाले आहे. पण सध्याच्या घडीला शार्दुल ठाकूर हा भन्नाट फॉर्मात आहे. त्यामुळे भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात यावी, असे म्हटले जात होते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: