arun haldar: राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष हलदर वानखेडेंच्या निवासस्थानी; म्हणाले…


हायलाइट्स:

  • राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची समीर वानखेडे यांच्या निवासस्थानी भेट.
  • यावेळी हलदर यांनी वानखेडे यांच्याकडील जातीशी संबंधित सर्व कागदपत्रे पाहिली.
  • अनुसूचित जातीच्या कोणत्याही अधिकाऱ्यावर जातीच्या आधारे कोणी आरोप केले तर आयोग गप्प बसणार नाही- हलदर.

मुंबई: राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे (NCSC) उपाध्यक्ष अरुण हलदर (Arun Haldar)यांनी आज रविवारी मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी हलदर यांनी समीर वानखेडे यांच्याकडे अनुसूचित जातीशी संबंधित कागदपत्रांची पाहणी केली. यावेळी हलदर यांनी अनुसूचित जातीच्या कोणत्याही अधिकाऱ्यावर जातीच्या आधारे कोणी आरोप केले तर आयोग गप्प बसणार नाही, असे वक्तव्य केले आहे. (deputy chairman of national commission for scheduled castes arun haldar visits the residence of sameer wankhede)

हलदर यांनी वानखेडे यांच्या निवासस्थानी दिलेल्या भेटीनंतर ते म्हणाले की, एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी त्यांच्या जातीशी संबंधित दाखवलेली कागदपत्रे आपल्याला दाखवली आहेत. ही कागदपत्रे पाहता ते अनुसूचित जातीमध्ये येणाऱ्या महार समाजातील असल्याचे दिसते. त्याची आई मुस्लिम होती, तिचे निधन झाले आहे. त्यांचा पहिला विवाह मुस्लिम महिलेशी झाला होता. परंतु ते विशेष विवाह कायद्यांतर्गत नोंदणीकृत होते. कागदपत्रांवरून त्यांचा आंतरधर्मीय विवाह वैध आहे. त्यांची दुसरी पत्नी हिंदू असून त्यांनी मुलाचे नावही हिंदू ठेवले आहे. त्याचे वडील महार समाजातील असल्याने समीरलाही अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळाले आहे.

क्लिक करा आणि वाचा- ड्रग्ज पार्टी प्रकरणात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा खळबळजनक आरोप, म्हणाले…

हलदर पुढे म्हणाले की, वानखेडे आपले काम निर्भयपणे करत आहेत. आपल्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. यासंदर्भात आयोगाने राज्य सरकारला १० दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. मात्र मी मुंबईत आल्यानंतर वानखेडे यांनी स्वत: मला त्यांची सर्व कागदपत्रे दाखवली असून संपूर्ण प्रकरणाची माहितीही दिली आहे.

क्लिक करा आणि वाचा- रामदास आठवलेंचा समीर वानखेडेंना पाठींबा; म्हणाले, ‘नवाब मलिकांचे सर्व आरोप निराधार’

तत्पूर्वी शनिवारी समीर वानखेडे यांनी अरुण हलदर यांची भेट घेऊन स्वतःवर होत असलेल्या धर्मांतराच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले. तसेच समीर वानखेडे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे स्वत:वर आणि कुटुंबावर झालेल्या धर्मांतराच्या आरोपांची तक्रार पाठवली होती. ही तक्रार आल्यानंतर आयोगाने राज्य सरकारला १० दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे, मात्र याच दरम्यान मुंबईत पोहोचलेल्या समीर वानखेडे यांनी आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी हलदर यांच्यापुढे आपली बाजू मांडली. या भेटीत वानखेडे यांनी आपल्या जातीशी संबंधित कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे हलदर यांना दाखवली.

क्लिक करा आणि वाचा- मलिकांचा वानखेडेंवर पुन्हा गंभीर आरोप; एनसीबी महासंचालकांकडे करणार तक्रार

आजच्या हलदर यांच्या भेटीनंतर वानखेडेनी माध्यमांशी बोलणे टाळले. या प्रकरणी मी माझे म्हणणे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांच्यापुढे मांडले असून तेच सर्व माहिती देतील, असे वानखेडे यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: