हायलाइट्स:
- सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेत कोट्यवधींची फसवणूक झाली आहे.
- इंडियन बँकेने या वर्षी मार्चमध्ये आरबीआयला ३५ कोटी रुपयांच्या फसवणुकीची माहिती दिली होती.
- सप्टेंबर तिमाहीत इंडियन बँकेचा निव्वळ नफा वाढून रु. १,०८९.१७ कोटी झाला आहे.
RBI ने चालू खात्याबाबत बँकांचे नियम केले सोपे; जाणून घ्या ताज्या अपडेट्स
बँकेने एमपी बॉर्डर चेकपोस्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (१६६.८९ कोटी रुपये), पुणे-सोलापूर रोड डेव्हलपमेंट (७२.७६ कोटी रुपये) आणि सोनाक (9SONAC) २७.०८ कोटी रुपयांची थकबाकी जाहीर केली आहे. तिन्ही प्रकरणांमध्ये थकबाकीला फंड डायवर्जन म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. इंडियन बँकेने सांगितले की, त्यांनी सोनाकविरुद्ध १२.५८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर इतर दोन खात्यांच्या बाबतीत, तरतुदी संपूर्ण एक्सपोजरच्या समान आहेत.
कमी किमतीच्या विम्याचा अभाव; ४० कोटी लोकांकडे नाहीय आरोग्य विमा संरक्षण
मार्चमध्येही झाली फसवणूक
इंडियन बँकेने या वर्षी मार्चमध्ये आरबीआयला ३५ कोटी रुपयांच्या फसवणुकीची माहिती दिली होती. बँकेच्या तीन खात्यांची माहिती आरबीआयला देताना बँकेने ती फसवी खाती असल्याचे सांगितले आणि त्यामध्ये एकूण ३५ कोटींहून अधिक रक्कम थकबाकी असल्याचेही सांगितले. बँकेने एस. कुमार्स नेशनवाइड लिमिटेड, प्रिया लिमिटेड आणि युवराज पॉवर प्रोजेक्ट्स ही तीन एनपीए खाती फसवी खाती म्हणून घोषित केली आहेत. एस. कुमार्स नेशनवाइड लिमिटेड १४.५१ कोटी, प्रिया लिमिटेड ९.७३ कोटी आणि युवराज पॉवर प्रोजेक्ट्स ११.०५ कोटी रुपये थकीत असल्याचे बँकेने म्हटले आहे.
दिवाळीपूर्वी सोने झाले स्वस्त ; जाणून घ्या आज किती रुपयांची झाली घसरण
दुसऱ्या तिमाहीत १६४ टक्क्यांनी वाढला नफा
सप्टेंबर तिमाहीत इंडियन बँकेचा निव्वळ नफा वाढून रु. १,०८९.१७ कोटी झाला आहे. वार्षिक आधारावर ही सुमारे १६४ टक्क्यांची वाढ आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत इंडियन बँकेचा निव्वळ नफा ४१२.२८ कोटी रुपये होता. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (NII) दुसऱ्या तिमाहीत ४०८३.४९ कोटी रुपयांवर घसरले. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ते ४,१४४.०४ कोटी रुपये होते. इंडियन बँकेचे ऑपरेटिंग मार्जिन वाढून २८.६३ टक्के झाले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ते २५.३३ टक्के होता. लॉकडाऊन संपल्यानंतर आर्थिक घडामोडी सुधारल्याचं इंडियन बँकेनं म्हटलं आहे, पण कोरोनामुळे उद्भवलेल्या अडचणींमुळे थकबाकीची प्रकरणे वाढू शकतात.