कमी किमतीच्या विम्याचा अभाव; ४० कोटी लोकांकडे नाहीय आरोग्य विमा संरक्षण


हायलाइट्स:

  • ४० कोटी लोकांकडे विम्याच्या स्वरूपातील कोणतीही आर्थिक सुरक्षा नाही.
  • ‘हेल्थ इन्शुरन्स फॉर इंडियाज मिसिंग मिडल’ या अहवालाचा निष्कर्ष
  • यामध्ये उपेक्षित गरीब वर्ग आणि तुलनेने संपन्न संघटित क्षेत्रातील लोक आहेत.

नवी दिल्ली : स्वस्त आरोग्य विमा उत्पादनांच्या अभावामुळे देशातील किमान ३० टक्के लोकसंख्येला म्हणजे ४० कोटी लोकांकडे विम्याच्या स्वरूपातील कोणतीही आर्थिक सुरक्षा नाही. ‘हेल्थ इन्शुरन्स फॉर इंडियाज मिसिंग मिडल’ या शीर्षकासह प्रसिद्ध करण्यात आलेल्या नीती आयोगाच्या अहवालात असे म्हटले आहे की, आरोग्य विमा कव्हरेजचा विस्तार हा सार्वत्रिक विमा संरक्षण (Universal health coverage) प्राप्त करण्याच्या भारताच्या प्रयत्नातील एक आवश्यक पाऊल आहे.

एलन मस्क बनले इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठा खजिना
अहवालात म्हटले आहे की, “लोकसंख्येच्या किमान ३० टक्के म्हणजे ४० कोटी लोक आरोग्यासंबंधीत आर्थिक सुरक्षेपासून वंचित आहेत. अहवालात त्याला ‘मिसिंग मिडल’ म्हटले आहे. कमी किमतीच्या आरोग्य विमा उत्पादनाच्या अभावामुळे स्वस्त प्रीमियम भरण्याची क्षमता असूनही या लोकांकडे आरोग्य विमा नाही. यामध्ये उपेक्षित गरीब वर्ग आणि तुलनेने संपन्न संघटित क्षेत्रातील लोक आहेत.

दिवाळी नव्हे दिवाळं निघणार! यंदा सण साजरा करताना खिशाला बसणार महागाईची झळ
आयुष्मान भारत योजनेद्वारे २५ कोटी लोकांनी विमा उतरवला
लोकसंख्येपैकी सुमारे २० टक्के म्हणजेच २५ कोटी व्यक्ती सामाजिक आरोग्य विमा आणि खाजगी आरोग्य विम्याद्वारे संरक्षित आहेत. उर्वरित ३० टक्के लोकसंख्या आरोग्य विम्यापासून वंचित आहे. पीएमजेएवाय (PMJAY) मधील वास्तविक कव्हरेज अंतर आणि योजनांमधील डुप्लिकेशन यामुळे विम्यापासून वंचित असलेली लोकसंख्या जास्त आहे.

दिवाळीत मुलीला द्या खास गिफ्ट; ‘या’ योजनेत गुंतवणूक करून तिचं भविष्य करा सुरक्षित
PMJAY सारखी नवीन योजना आणण्याच्या विचारात सरकार
केंद्र सरकार प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) सारखी आणखी एक योजना आणू शकते. सरकारचे लक्ष देशातील अशा ४० कोटी लोकांवर आहे, ज्यांच्याकडे कोणताही विमा नाही. या नवीन योजनेत या लोकांना विम्याचा लाभ दिला जाऊ शकतो. सरकारने यासाठी २१ विमा कंपन्यांचा विचार केला आहे, ज्या अतिशय स्वस्त दरात (सबसिडी दराने) लोकांचा विमा करतील. हा कार्यक्रम पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू केला जाऊ शकतो.

मध्यमवर्गावर लक्ष
ज्या ४० कोटी लोकांकडे वैद्यकीय विमा संरक्षण नाही. त्यांना ‘मिसिंग मिडल’ असे म्हटले जाते. श्रीमंत आणि गरीबांमध्ये नसलेले असे ४० कोटी विमा नसलेले लोक आहेत, ज्यांच्यासाठी सरकार नवीन योजना सुरू करू शकते. या लोकांना विम्याचा लाभ न दिल्यास आणि ते महामारीच्या विळख्यात सापडले, तर आपत्कालीन परिस्थितीमुळे असे लोक गरिबीत जाऊ शकतात, असा सरकारचा विश्वास आहे. जर काही गंभीर आजार असेल, तर या लोकांच्या उपचारावर भरपूर पैसा खर्च होतो आणि जमा केलेले भांडवल खर्च होऊन जाते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: