Nawab Malik: ‘चंद्रकांत पाटलांनी मला खिशात ठेवले तर मी त्यांच्या…’; नवाब मलिक यांचे थेट आव्हान


हायलाइट्स:

  • मला खिशात ठेवाच, खिशात काय काय आहे हे समोर आणतो.
  • चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा मलिक यांनी घेतला समाचार.
  • वानखेडे-मलिक वादावर बोलताना पाटलांनी केले होते विधान.

मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा खिसा इतका मोठा आहे हे मला माहीत नव्हतं. मी वाट बघतोय ते कधी मला त्यांच्या खिशात टाकतायत’, असे खुले आव्हानच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. ( Nawab Malik Challenges Chandrakant Patil )

वाचा: नवाब मलिक यांचा समीर वानखेडेंवर नवा आरोप; ‘नोकरी वाचवण्यासाठी…’

चंद्रकांत पाटील यांनी मी नवाब मलिक यांना खिशात ठेवतो, असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याला नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील यांनी मला त्यांच्या खिशात ठेवले तर मी त्यांच्या खिशात काय काय आहे हे जनतेसमोर आणणार आहे. त्यासाठी चंद्रकांत पाटील, तुम्ही मला तुमच्या खिशात टाकाच, असे आव्हान नवाब मलिक यांनी दिले. चंद्रकांत पाटील यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही लक्ष्य केले होते. चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही. त्यांनी आपली मर्यादा ठेवून बोलावे, असा इशारा मुंडे यांनी दिला होता. चंद्रकांत पाटीलच काय भाजपच्या राज्यातल्या किंवा केंद्रातल्या कोणत्याच नेत्याचे खिसे एवढे मोठे नाहीत की ते आम्हाला खिशात ठेवतील. आम्हाला खिशात ठेवण्याच्या गोष्टी करू नका, असेही मुंडे यांनी सुनावले होते.

वाचा: नवाब मलिक यांचा धक्कादायक दावा; ‘शाहरुखला सांगण्यात येतंय की…’

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

पुण्यातील तळेगाव येथे पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी समीर वानखेडे व नवाब मलिक यांच्यातील वादावर प्रतिक्रिया दिली होती. ‘ समीर वानखेडे हे काही माझे किंवा भाजपचे जावई नाहीत. वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात जे काही सुरू आहे ते सुरू राहावं. माझी त्याला काहीच हरकत नाही. परंतु, सर्वसामान्य माणूस हा वानखेडे यांच्या मागे उभा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. मलिक यांनी सामान्यांची जास्त टेस्ट घेऊ नये. कारण समाज हा नेहमी ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्या पाठीशी उभा राहत असतो, हे मलिक यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे, असा सूचक इशारा पाटील यांनी दिला होता. नवाब मलिक हे रोज भाजपवर टीका करतात असा प्रश्न विचारला असता ‘असे लोक मी खिशात ठेवतो’ असे वक्तव्य पाटील यांनी केले होते. त्याचे पडसाद उमटू लागले असून आधी धनंजय मुंडे यांनी तर आता खुद्द मलिक यांनी पाटलांचा समाचार घेतला आहे.

वाचा: मुंबई लोकलचं तिकीट केव्हापासून?; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णयSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: