कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात तीनशे पंधरा जणांचे लसीकरण

पंढरपूर – रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व पंढरपूर नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने युवा स्वास्थ कोव्हीड लसीकरण मोहिमे अंतर्गत महाविद्यालयात दि.२५ ते ३० ऑक्टोबर २०२१ या कालावधीत उभारलेल्या कोव्हीड सेंटरवर तीनशे पंधरा विद्यार्थी व पालकांनी लस घेतली आहे. यामध्ये एकशे एकोणनव्वद विद्यार्थी व एकशे सव्वीस पालकांचा समावेश आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार हे सेंटर दि. २ नोव्हेंबरपर्यंत कार्यरत राहणार आहे. तरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी, त्यांच्या पालकांनी व परिसरातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे यांनी केले आहे.
हा उपक्रम राबविण्यासाठी उपप्राचार्य डॉ.बजरंग शितोळे,महाविद्यालय अंतर्गत सुधार समितीचे समन्वयक डॉ.अमर कांबळे,डॉ.सुशील कुमार शिंदे, डॉ. दत्तात्रय काळेल, प्रा.डॉ.दत्तात्रय चौधरी, प्रा.श्रीमती सुमन केंद्रे, प्रा.डॉ. नवनाथ पिसे, प्रा.डॉ.अमोल ममलय्या, प्रा.योगेश पाठक, प्रा.दादासाहेब आरेकर, कार्यालयीन प्रमुख अनंता जाधव,पुष्पलता जाधव,विद्या आधटराव, कोमल बाबर, मनीषा बाबर, आशा वर्क्स सुवर्णा माने यांनी प्रयत्न केले.