देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे होत आहेत. यापार्श्वभूमीवर देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होतोय. यामुळे यंदाच्या राष्ट्रीय एकता दिनाला अधिक झळाळी आली आहे. आणि आज सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. स्वातंत्र्यानंतर ब्रिटीशांनी भारताचे अनेक तुकडे करण्याचा प्रयत्न केला. पण ब्रिटीशांचा हा कट सरदार पटेल यांनी उधळून लावला आणि अखंड भारतासाठी लढले, असं अमित शहा म्हणाले.
केवडिया हे फक्त एका ठिकाणाचे नाव नाहीए. तर राष्ट्रीय एकात्मतेचे श्रद्धास्थान आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा आकाशाला उंच भिडणारा पुतळा हा भारताच्या उज्ज्वल भवितव्याचा संदेश जगाला देतोय. भारताची एकता आणि अखंडतेला कुणीही ठेच पोहोचवू शकत नाही, असा संदेशही जगाला दिला गेला आहे. शतकानुशतके एकच सरदार होऊ शकतो. तो एक सरदार शतकानुशतके प्रेरणा बनतो, असं शहा म्हणाले.
Ashok Gehlot: मी जादूगार, म्हणून चालला खेळ; मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य
स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई यांना जाणूनबुडून विसरण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांच्या योगदानाचा आदर केला गेला नाही. त्यांना भारतरत्नही दिला गेला नाही आणि त्यांचा सन्मानही केला गेला नाही. पण परिस्थिती बदलली. भारतरत्न पुरस्काराने त्यांचा सन्मान केला गेला आणि आता जगातील सर्वात उंच त्याचा पुतळा आपल्याला बघायला मिळतोय, असं म्हणत अमित शहांनी काँग्रेससह विरोधी पक्षांनीवर शरसंधान साधलं.
Mamata Banerjee in Goa: ‘काँग्रेसमुळे मोदीजी शक्तीशाली’, ममतांकडून एका दगडात दोन पक्षी