Ind Vs Nz Match Preview: न्यूझीलंडला रोखण्याचे आव्हान; भारतासाठी ‘करा अथवा मरा’


दुबई: भारतीय संघाला टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत सलामीच्या लढतीत पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. आता भारतीय संघाला उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी गटातील दुसरा आव्हानात्मक संघ न्यूझीलंडवर विजय आवश्यक आहे. त्यामुळे आज (रविवार) न्यूझीलंडविरुद्ध होणारी लढत भारतासाठी ‘करा अथवा मरा’ स्वरूपाची असणार आहे. दुसरीकडे, अशीच स्थिती न्यूझीलंडची आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे.

वाचा- भारतीय संघाला मिळाली गुड न्यूज; न्यूझीलंडविरुद्धच्या विजयासाठी…

पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ तिन्ही आघाड्यांवर निष्प्रभ ठरला. मात्र, हा पराभव विसरून भारताला नव्या उत्साहात न्यूझीलंडला सामोरे जावे लागणार आहे. कारण न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवणेही सोपे नसेल. वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंड संघ हा नेहमीच भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. त्यात मोठ्या स्पर्धेत टीम साउदी आणि ट्रेंट बोल्ट हे गोलंदाज भारतीय फलंदाजांना नेहमीच सतावतात. तेव्हा मागील चुकांमधून धडा घेत भारतीय फलंदाजांना आणखी एका मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. रोहित शर्मा, लोकेश राहुल ही सलामी जोडी पाकिस्तानविरुद्ध झटपट माघारी परतली होती. सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंतला चांगल्या सुरुवातीचे रूपांतर मोठ्या खेळीत करता आले नव्हते. विराट कोहलीने एका बाजूने किल्ला लढविला होता. अखेरच्या षटकांमध्ये रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्याकडून फटेबाजीची अपेक्षा आहे.

वाचा- विराट कोहलीने सुनावले; अशा लोकांची मला कीव वाटते

न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलला दुखापत झाली आहे. तो भारताविरुद्ध खेळणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. केन विल्यमसन, डॅर्ली मिचेल, जेम्स नीशम, डेव्हॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स असे आक्रमक फलंदाज न्यूझीलंडकडे आहेत. भारताच्या जसप्रीत बुमराह, महंमद शमी, भुवनेश्वर, वरुण चक्रवर्ती, रवींद्र जडेजा यांच्यावर न्यूझीलंडच्या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान असेल. न्यूझीलंडकडे मिचेल सँटनर, टीम साउदी, ट्रेंट बोल्ट, जेम्स नीशम, इश सोधी असे चांगले गोलंदाज आहेत. त्यामुळे भारतीय फलंदाज विरुद्ध न्यूझीलंडचे गोलंदाज अशी लढत रंगण्याचीही शक्यता आहे. भारतीय संघात बदल होण्याची शक्यता कमीच आहे.

वाचा- रोनाल्डो दुसऱ्यांदा होणार जुळ्यांचा बाप; गर्लफ्रेंडसोबत फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

यातून होणार संघ निवड :

भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वरकुमार, महंमद शमी, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, शार्दूल ठाकूर, आर. अश्विन, ईशान किशन, राहुल चहर.

न्यूझीलंड – केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गप्टील, डॅर्ली मिचेल, डेव्हॉन कॉनवे, टिम सेफर्ट, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, इश सोधी, ट्रेंट बोल्ट, टिम साउदी, मार्क चॅपमन, अॅडम मिल्ने, काइल जेमिसन, अॅस्टल.

वाचा- दिग्गज खेळाडूकडून झाली मोठी चूक; १ चेंडूवर दिल्या १० धावा

आयसीसी क्रमवारी

२ – भारत

४- न्यूझीलंड

आमनेसामने

१६ टी-२०

८ भारताचे विजय

८ न्यूझीलंडचे विजय

गोलंदाजीत सहावा पर्याय असणे महत्त्वाचे असते. मग तो मी असेल किंवा हार्दिक पंड्या. तो एक-दोन षटके टाकण्याइतपत तंदुरुस्त आहे. अर्थात, लढतीच्या स्थितीवरून गोलंदाजातील सहावा पर्याय वापरला जाईल. मागील लढतीत पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली असती, तर मीही एक-दोन षटके टाकली असती. शार्दूल हा आमच्या योजनेचा भाग आहे. मात्र, एखाद्या वेळी गोलंदाजांना विकेट मिळू शकत नाही. आमचे गोलंदाज सर्वोत्तम आहेत, यात शंका नाही.

– विराट कोहली, भारताचा कर्णधार


दृष्टिक्षेप…

– गेल्या पाच सामन्यांत भारताचे दोन विजय अन् तीन पराभव, तर न्यूझीलंडचा एक पराभव आणि चार लढती रद्द

– मागील पाचही सामन्यांत भारताने न्यूझीलंडला नमविले आहे. यातील दोन विजय हे सुपर ओव्हरमध्ये मिळविले आहेत.

– या लढतीत अपेक्षित तापमान ३२ अंश सेल्सिअस असेल. मात्र, वाढत्या आर्द्रतेमुळे उकाडा जास्त होणार. प्रसंगी लढतीच्यावेळी तापमान चाळीसच्या आसपास आहे, असे खेळाडूंना वाटेल. उत्तरेकडून वाहणारे मध्यम वारे काहीसा दिलासा देऊ शकतील.

खेळपट्टीचा अंदाज- अबुधाबीच्या तुलनेत दुबईची खेळपट्टी गोलंदाजांना जस्त साथ देणारी. त्याचबरोबर येथील सीमारेषा शारजाच्या तुलनेत लांब आहे. त्यानंतरही षटकामागे आठच्या आसपास धावा अपेक्षित आहेत.

स्थळ : दुबई इंटरनॅशनल स्टेडियम
वेळ : सायंकाळी ७.३० पासूनSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *