शमीला ट्रोल करणाऱ्यांना विराट कोहलीने सुनावले; धर्मावरून टीका करणे ही…


दुबई: ‘एखाद्या व्यक्तीवर त्याच्या धर्मावरून टीका करणे ही अत्यंय निराशाजनक गोष्ट आहे,’ अशा शब्दांत वेगवान गोलंदाज महंमद शमीला ट्रोल करणाऱ्यांना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सुनावले.

वाचा- भारतीय संघाला मिळाली गुड न्यूज; न्यूझीलंडविरुद्धच्या विजयासाठी…

भारताला टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत सलामीच्या लढतीत पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. यातील भारतीय गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाही. त्यात शमी महागडा ठरला. यानंतर चिडलेल्या चाहत्यांनी शमीला त्याच्या धर्मावरून ट्रोल केले. सोशल मीडियावर काहींनी शमीला देशद्रोही म्हटले आणि त्याला संघातून काढून टाकायला हवे, असेही म्हटले. यानंतर अनेक आजी-माजी खेळाडूंनी शमीला पाठिंबा दिला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत कोहलीने यावर भाष्य केले. कोहली म्हणाला, ‘धर्मावरून एखाद्या व्यक्तीला ट्रोल करणारी भावना नसलेली लोक आहेत. यांच्यात आयुष्यात समोरासमोर एखाद्या व्यक्तीला सामोरे जाण्याची हिंमत नसते. आम्ही मैदानात उतरतो, त्याला काहीतरी कारण आहे. मात्र, कारण नसताना एखाद्या व्यक्तीला ट्रोल करणाऱ्या लोकांची मला कीव वाटते. माणुसकीला काळीमा फासणारी ही गोष्ट आहे.’

वाचा- रोनाल्डो दुसऱ्यांदा होणार जुळ्यांचा बाप; गर्लफ्रेंडसोबत फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

वाचा- दिग्गज खेळाडूकडून झाली मोठी चूक; १ चेंडूवर दिल्या १० धावा

शमीवर टीका करण्यात आल्यानंतर फेसबुकने हा आक्षेपार्ह मजकूर लगेचच काढून टाकला होता. मात्र, यानंतर काहींनी इतर सोशल मीडियाचा वापर करून शमीला जाणुनबुजून लक्ष्य केले. तोच धागा पकडून कोहली म्हणाला, ‘प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. एखाद्या स्थितीबद्दल काय वाटते, यासाठी लोक नक्कीच व्यक्त होतात. मात्र, धर्मावरून एखाद्या व्यक्तीला डिवचणे यासारखी निराशाजनक गोष्ट कुठलीच नाही. धर्म ही खूप पवित्र गोष्ट आहे.’ शमीने देशासाठी मोठे योगदान दिले आहे. अनेक विजयांत मोलाचा वाटा उचलला आहे. कसोटीमध्ये जेव्हा प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकायचा असतो, तेव्हा जसप्रीत बुमराहसह तो आमचा प्रमुख गोलंदाज ठरतो. त्याच्या या कामगिरीकडे दृर्लक्ष करून त्याच्यावर टीका करणाऱ्यांसाठी मी माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही, असेही कोहलीने स्पष्ट केले. ‘आम्ही सर्वजण त्याच्या पाठीशी आहोत. त्याला पुन्हा धर्मावरून टीका करणाऱ्यांनी आणखी शक्ती लावावी. याचा आमच्या बंधुत्वावर, मैत्रीवर काहीही परिणाम होणार नाही. एक कर्णधार म्हणून तुम्हाला खात्री देतो, आमच्या संघात एक संस्कृती आहे. अशा खालचा स्तराचा विचार संघात कुणाच्याही मनाला शिवत नाही,’ असेही कोहली म्हणाला.

वाचा- कोहलीनंतर पाकिस्तानी पत्रकाराचा या कर्णधाराला बेताल सवाल; खेळाडू परिषदेतून उठून

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू विशेष असतात. येथपर्यंत पोहोचण्यासाठी ते किती गोष्टींचा त्याग करतात, याची सामान्य माणसांना कल्पना नसते. प्रत्येक वेळी केलेला त्याग सांगायची आम्हाला गरज वाटत नाही. मात्र, नैराश्य आलेली काही लोक सोशल मीडियावर व्यक्त होऊन स्वत:ला लपविण्याचा प्रयत्न करतात. ही अतिशय वाईट गोष्ट आहे. बाहेरच्या जगातील लोक कसे व्यक्त होतात, याला आमच्या संघात काही किंमत नाही. त्यावर आम्ही कधीच लक्ष देत नाही आणि देणारही नाहीत.विराट कोहली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: