शेतकऱ्यांची देणी देण्यासाठी बांधील – चेअरमन कल्याणराव काळे
पंढरपूर /प्रतिनिधी,दि.30 - गेल्या दोन वर्षात साखर कारखानदारी अडचणीत होती अपेक्षित गाळप झाले नाही.कारखानदारी अडचणीत आली मात्र या सर्व अडचणीतून मार्ग काढत आम्ही स्वतःच्या मालमत्ता सहकारी संचालक सहकारी यांच्याकडे तारण ठेऊन कर्ज काढून सिताराम व सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांच्या उसाचे सर्व एफआरपी पूर्ण केली आहे. सीताराम महाराज साखर कारखान्याच्या शेतकरी यांचे देणं शेअर्सची रक्कम देणार असून एक रुपया ही कोणाचा बुडणार नाही. तो देण्यासाठी आम्ही बांधील आहोत,असे चेअरमन कल्याणराव काळे यांनी पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत सांगितले.या पत्रकार परिषदेस संचालक महादेव देठे कार्यकारी संचालक समाधान काळे सुधाकर कवडे आदी उपस्थित होते.
सहकार शिरोमणी आणि सिताराम साखर कारखाना सर्व शेतकऱ्यांची एफआरपी ची रक्कम देऊन गळीत हंगामास सुरुवात झाल्यानंतर वैयक्तिक स्वार्थापोटी काही लोक संस्थेची बदनामी करीत आहे .कारखाना सुरू झाला म्हणून वाईट वाटत आहे , त्यामुळे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. वैयक्तिक स्वार्थासाठी सहकार शिरोमणी कारखान्याला पैसे उपलब्ध होऊ नयेत म्हणून काही लोकांनी प्रयत्न केले मात्र सर्व सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीने पैसे उपलब्ध होऊन पाठीमागील शेतकऱ्यांची सर्व देणी पूर्ण दिली आहेत. दोन्ही कारखान्याचे गाळप सुरू झाल्याने काही लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी बिन बुडाचे आरोप करत आहेत यामध्ये काहीही तथ्य नाही.कोणाचा एक रुपया ही बुडणार नाही असे काळे यांनी सांगितले.
विठ्ठल कारखाना सुरू होण्यास विलंब होत असला तरी त्या सभासदांचाही सर्व ऊस गाळप होईपर्यंत सहकार शिरोमणी व सिताराम कारखाना बंद होणार नाही.काहीजण विनाकारण शेतकऱ्यांच्या संस्थांना बदनाम करत आहेत. वेळ आल्यावर आम्हाला जे बोलायचे ते आम्ही बोलू . शेतकरी संघटना एफआरपीसाठी आंदोलन करतात, कारखानदारांच्या सोबत भांडतात परंतु शेतकरी संघटनांनी संस्था बंद पाडण्यासाठी कधीही प्रयत्न केले नाहीत. संस्था टिकावी शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळावे यासाठी ते प्रयत्न करीत असतात परंतु आज काही जण विनाकारण संस्थेला बदनाम करून संस्था बंद पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत तो यशस्वी होणार नाही, असेही सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी सांगितले .