हायलाइट्स:
- अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एक फोटो ट्विट केला आहे.
- फोटोत दिसणाऱ्या व्यक्तीचे दाऊद वानखेडे आणि समीर वानखेडे यांच्याशी नाते काय आहे? मलिकांचा सवाल.
- या फोटोप्रकरणी मलिक लवकरच खुलासा करण्याची शक्यता.
मंत्री नवाब मलिक गेले काही दिवस ज्या प्रमाणे एखादा मुद्दा उपस्थित करत नंतर त्यांचा खुलासा करत आहेत, त्यानुसार ही व्यक्ती कोण आहे याचा खुलासाही ते लवकरच करतील अशी शक्यता आहे. नवाब मलिक या ट्विटमधील या व्यक्तीबाबत काय खुलासा करणार हे सांगणे कठीण असले तरी देखील त्या व्यक्तीचे समीर वानखेडे किंवा त्यांच्या कुटुंबीयांशी नाते आहे का?, असल्यास ते काय नाते आहे हे स्पष्ट झाल्यानंतरच मलिक यांना काय सांगायचे आहे हे स्पष्ट होणार आहे.
क्लिक करा आणि वाचा- मलिकांचा वानखेडेंवर पुन्हा गंभीर आरोप; एनसीबी महासंचालकांकडे करणार तक्रार
क्लिक करा आणि वाचा- मी आताच नावं घ्यायला सुरुवात केली आहे, इतकं का घाबरताय?: नवाब मलिक
मलिकांनी वानखेडेंवर केला गंभीर आरोप
अमली पदार्थविरोधी कारवाई करताना समीर वानखेडे यांनी आतापर्यंत शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी सोबत न घेता त्यांनी प्रायव्हेट आर्मी तयार करुन दहशत निर्माण केली होती, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. हे मी भविष्यात सिध्द करून दाखवेन असेही मलिक यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- दिलासा; राज्यात आज करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या घटली; बरे होणारे रुग्ण वाढले
एका रेस्टॉरंटमधून क्रूझवर गेले ड्रग्ज- मलिक
मुंबईतील क्रुझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीमध्ये एका रेस्टॉरंटमधून आलेल्या जेवणासोबतच ड्रग्ज नेले गेले होते आणि याचे सगळे पुरावे माझ्याकडे असून मी ते उघड करणार आहे, असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे. इतकेच नाही, तर आपल्याकडे असलेले सर्व पुरावे आपण एनसीबीच्या महासंचालकांना देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.