पुणे : पुण्यातील बालेवाडी परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. बालेवाडीतील पाटील नगर येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी स्लॅब (Pune Building Collapse) कोसळला. या दुर्घटनेत काही जण जखमी झाल्याची आणि अडकल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, या परिसरात प्रशासनाकडून बचावकार्य सुरू असून स्लॅबखाली अडकेल्या इतर लोकांना बाहेर काढलं जात असल्याची माहिती आहे.